शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून ठप्प असलेले पुणे विमानतळ उड्डाणासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 9:05 PM

देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीला केंद्र सरकारने दाखविला हिरवा कंदील

ठळक मुद्दे२५ मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याची घोषणा विमानतळावर प्रवेशासाठी मास्क, हातमोजे, सॅनिटायझर बंधनकारक विमानतळ इमारतीमध्ये प्रवाशांचे थर्मल स्क्रिनींग करूनच प्रवेश दिला जाणार

पुणे : देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला असून पुणेविमानतळही विमान उड्डाणांसाठी सज्ज झाले आहे. पण अद्याप विमानतळावर दररोज किती विमानांचे उड्डाण होणार, किती व कोणत्या शहरातून विमाने उतरणार, याची माहिती विमानतळ प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. ही माहिती मिळाल्यानंतर पुणे विमानतळाबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून विमानसेवा ठप्प आहे. पण ही सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने हो असल्याने नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दि. २५ मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याची घोषणा गुरूवारी केली. ही सेवा सुरू करण्यासाठी नियमावलीही तयार करण्यात आली आहे. तसेच विमानांचे कमाल व किमान तिकीट दरही निश्चित करण्यात आले आहेत. यापार्श्वभुमीवर पुणे विमानतळही विमान वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी याबाबत ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. विमानतळावर सध्या स्वच्छतेबाबतचे सर्व प्रोटोकॉल पाळले जात आहेत. विमानतळावर प्रवेशासाठी मास्क, हातमोजे, सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. त्यादृष्टीने विमानतळावर प्रवेशद्वारावरच या वस्तुंच्या विक्रीची सोय केली जात आहे. विमानतळ इमारतीमध्ये प्रवाशांचे थर्मल स्क्रिनींग करूनच प्रवेश दिला जाणार आहे. कोणतीही लक्षणे असलेल्या प्रवाशांना परत पाठविले जाईल. या तपासणीसाठी स्वतंत्र कर्मचारी असतील. मोबाईलमध्ये आरोग्य सेतु अँप डाऊनलोड करणेही आवश्यक आहे.एखादी वस्तु, खाद्यपदार्थ खरेदी करताना अधिकाधिक डिजिटल व्यवहार व्हावेत, यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. विमानतळावर प्रवासी आल्यानंतर त्यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राहावे, यासाठी ठिकठिकाणी खुणा करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी स्टीकर्स चिटकविण्यात आले आहेत. ट्रॉलींची स्वच्छताही सातत्याने कील जात आहे. तरीही संपर्क टाळण्यासाठी ट्रॉलीचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी कमीत कमी सामान आणावे, अशी अपेक्षा आहे.----------------------अद्याप वेळापत्रक नाहीविमानसेवा सुरू होणार असली तरी पुणे विमानतळावरून कोणत्या शहरांसाठी किती विमानांचे उड्डाण होणार, किती विमान उतरणार याचे वेळापत्रक विमानतळ प्रशासनाला मिळालेले नाही. त्यामुळे विमान उड्डाणांची स्थिती गुलदस्त्यात आहे. विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनीही याला दुजोरा दिला.-------

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसairplaneविमान