पुण्यातील आंबील ओढ्याजवळचा कारवाईला विरोध करणाऱ्या १०० नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात झाली आहे.
पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळील आंबील ओढ्याजवळ असणाऱ्या वस्तीत महापालिकेचा वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात येते आहे. या परिसरात पूर येऊ नये म्हणून आंबील ओढ्याची लांबी रुंदी वाढण्याचे काम केले जात आहे. तसेच या लागत भिंत देखील बांधली जात आहे. तसेच या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना देखील राबवली जात आहे. या सगळ्यासाठी इथल्या रहिवाशांची घरे पाडण्यात येत आहेत.
मात्र आज सकाळपासून या कारवाईला नागरिक मोठ्या प्रमाणावर विरोध करत आहेत. या कारवाईला विरोध करण्यासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी विरोध करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.जे नागरिक विरोध करत आहेत अशा १०० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापुढे देखील जे विरोध करतील त्यांचावर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले जाईल असे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले.यानंतर आता कारवाईला सुरुवात करत इथली घरे पडायला सुरुवात झाली आहे.दरम्यान या सर्व लोकांची राहण्याची सोय ट्रान्झिट कॅम्प मध्ये सोय केली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.