शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

कॅडबरीत अळी : कंपनी म्हणते, 'परत सापडली तर पाठवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 7:47 AM

'एक्स'वरील व्हिडीओमध्ये रेंगाळताना दिसते अळी

पुणे : कॅडबरी चॉकलेटमध्ये अळी आढळल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी यासंबंधित 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्विट केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये जिवंत अळी चॉकलेटमध्ये रेंगाळताना दिसत आहे. यासंबंधित कंपनीकडे तक्रार केली असता कंपनीने, 'पुढच्या वेळेस अशी घटना घडल्यास आमच्या पत्त्यावर ती कॅडबरी पाठवा' असे उत्तर दिले आहे. प्रसिद्ध चॉकलेट कंपनी 'कॅडबरी डेअरी मिल्क'च्या चॉकलेटमध्ये याआधीही अळी सापडल्याचे प्रकार घडले आहेत. ग्राहकांनी सोशल मीडियावर व्यक्त केला रोष पुण्यामध्ये पुन्हा कॅटबरीत अळी सापडल्याने ग्राहकांनी सोशल मीडियावर रोष व्यक्त केला आहे. अक्षय जैन यांनी 'कॅडबरी टेंटेशन्स रम आणि मनुका प्रीमियम चॉकलेट बार' ही कॅडबरी मागवली होती. त्यांनी ती खाण्यासाठी रॅपर उघडले असता त्यामध्ये दोन अळ्या आढळून आल्या. त्यानंतर अक्षय जैन यांनी त्याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ कंपनीला पाठवत नाराजी व्यक्त केली आहे. 

याआधीही सापडली होती अळी 

अक्षय जैन यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

कॅडबरी चॉकलेटमध्ये अळी आढळल्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ माजली आहे.

सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू असताना, आणखी अभिनंदन रिसबूड या व्यक्तीने चॉकलेटचा फोटो शेअर करत त्याच्याकडच्या चॉकलेटमध्येही अळी सापडल्याचे सांगितले आहे. 

यासोबतच अनेकांनी अशा घटना यांच्याबाबतही घडल्याची नोंद केली. 

आम्हाला खेद आहे की आमच्या उत्पादनांमध्ये... 

या प्रकरणावर कॅडबरीने प्रतिक्रिया देताना म्हटले की, आम्हाला खेद आहे की आमच्या उत्पादनांमध्ये असा अनुभव आला. कृपया भविष्यात असे काही आढळल्यास, आम्हाला ते चॉकलेट आणि त्यामध्ये सापडलेले पदार्थ पाठवा. 

तुमच्या समस्येचे निराकरण करू. कंपनीच्या या उत्तरावर अक्षय जैन यांनी नाराजी व्यक्त केली, 'कॅडबरी चॉकलेटची गुणवत्ता आणि सुरक्षितता यावर विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी ही धक्कादायक घटना आहे' असे मत त्यांनी व्यक्त केले. 

यानिमित्ताने खाद्यपदार्थाची गुणवत्ता आणि एक्स्पायरी डेटचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याने ग्राहकांनी दक्षता घेणे महत्वाचे आहे

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य