पुणे : पुणे- शिरुर- नगर महामार्गाबाबतही अनेक तक्रारी समोर येत आहे. दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पुणे- नगर महामार्गावर डबल लेन पूल करायला सांगितले होते. १६ लेनच्या रस्त्याचे डिझाईन सुद्धा करायला सांगितले होते. आता आगामी ६ महिन्यांत या कामांना काम सुरुवात होणार आहे. त्याचवेळी पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अॅक्सेस रोड होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केली आहे. नितीन गडकरी हे शनिवारी पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गडकरी म्हणाले, पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अॅक्सेस रोड झाल्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच पुणे मुंबई वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे त्याच सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात या राज्यातून थेट दक्षिणेतील हैदराबाद, बेंगलोर,त्रिवेंद्रम आणि चेन्नई अशा चार दिशांना जाणारी ट्रॅफिक खूप मोठी आहे.त्यामुळे आम्ही मुंबई ते दिल्ली असा हा बारा लेनचा महामार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे मुंबई - दिल्लीपर्यंत अंतर १२-१३ तासांत कापता येईल. तसेच सुरतपासुन नवा हायवे केल्याने पुणे,मुंबई, नगर, नाशिक महामार्गावरची ट्रॅफिक कंजेशन आणि प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे.
कोथरूड येथील चांदणी चौकामधील उड्डाणपूल हा महत्वाचा आहे. हा एकप्रकारे पुण्याचा वेस्टर्नली बायपास असणार आहे. दिवसागणिक मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती वाढत असल्यामुळे तितक्याच विस्तृत प्रमाणात समस्या सुद्धा उद्भवत आहे. पण त्याचा २१-१-२०२३ ला पूर्ण होणार ब्रीज आहे. त्यामुळे वर्षभरात काम होईल का याचा आढावा घ्यायला सांगितले आहे. लष्कराच्या परवानग्यांमुळे अनेक कामांना उशीर होतो. नागपूर मध्ये देखील असा प्रकार घडला. मात्र पुण्यात अधिकारी- लष्कर विभागाकडुन उशीर नाही. याबाबत सगळे निर्णय झाले आहेत, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.