पुणे : पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक चौरंगी होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. हणमंत करजगीकर, भजनलाल निमगावकर, सुभाष पवार आणि प्रवीण येसादे या उमेदवारांमध्ये ही निवडणूक रंगणार आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत असोसिएशनचा अध्यक्ष ठरणार आहे.बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी २ जागांसाठी भूपेंद्र गोसावी, संजीव जाधव, रेखा करंडे (दांगट), इब्राहिम शेख, सचिन झालटे (पाटील) हे पाच उमेदवार आहेत. सचिव पदांच्या दोन जागांसाठीची लढत श्रीकृष्ण घुगे, लक्ष्मण घुले, गीतांजली कडते, विकास कांबळे, संतोष शिंदे आणि नगमा टंडन यांच्यात आहे. खजिनदार पदासाठी पूनम स्वामी आणि प्रतापराव मोरे, तर हिशेब तपासणीस पदाची लढत नागेश जेधे आणि सुदाम मुरकुटे हे सर्व उमेदवार रिंगणात आहे. पुणे बार असोसिशनचे माजी अध्यक्ष अॅड. एन. डी. पाटील या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. अॅड. शिरीष शिंदे, अॅड. श्रीकांत आगस्ते, अॅड. हेमंत गुंड, अॅड. अभिजित भावसार, अॅड. सुप्रिया कोठारी, अॅड. अमोल जोग, अॅड. काळूराम भुजबळ आणि अॅड. रवि पवार हे उपमुख्य निवडणूक अधिकारी आहेत.
दहा कार्यकारिणी सदस्यांची सोडत पद्धतीने निवड कार्यकारिणी सदस्य पदासाठी चेतन औरंगे, समीर भुंडे, आशिष गवारे, पंजाब जाधव, गणेश लेंडे, लक्ष्मी माने, प्रियदर्शनी परदेशी, योगेश पवार, रमेश राठोड आणि रफिक शेख या दहा जणांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणी सदस्य पदासाठी ३१ अर्ज आले होते. त्यापैकी ६ अर्ज नामंजूर झाले. २५ अर्ज मंजूर झाले. त्यामध्ये २१ पुरुष उमेदवार होते, तर चार महिला उमेदवार होते. २१ पुरुष उमेदवारांपैकी ८, ४ महिला उमेदवारांपैकी दोन उमेदवारांची चिठ्ठ्या पद्धतीने निवड करण्यात आली.