पुणे - काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करताच, कसबा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं आहे. धंगेकर यांच्या समर्थकांनी जनतेच्या मनातील आमदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावत भाजप आमदार हेमंत रासने यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला, त्यामुळे शिंदेसेनेचे स्थानिक शिलेदार तर अस्वस्थ झाले आहेतच, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाही जाहीर नाराजी व्यक्त करण्यात सुरूवात केली आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काही बोलत असतील तर ते त्यांचे अनुभवातून आलेले मत आहे, असे म्हणत खुद्द उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही नाराज भाजप कार्यकर्त्यांची पाठराखण केली होती.
'जनतेच्या मनातील आमदार..' धंगेकरांच्या रासनेंविरोधातील बॅनरबाजीने महायुतीत धुसफूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:17 IST