शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

फरार असताना दत्तात्रय गाडेचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न? मानेवर व्रण, पोलीस आयुक्तांची माहिती..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:38 IST

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण सर्च ऑपरेशन बाबत माहिती दिली.  

-किरण शिंदे पुणे: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवार-शुक्रवार दरम्यानच्या मध्यरात्री १.३० वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्याच्या मानेवर दोरखंडासारखे व्रण आढळल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? याचा तपास करण्याची गरज आहे, असे पुणेपोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आरोपी गाडेच्या अटकेनंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण शोध मोहिमेबाबत माहिती दिली.

 

५०० हून अधिक पोलिसांचा शोध मोहीमेत सहभाग

अमितेश कुमार म्हणाले, “गेल्या तीन दिवसांपासून पुणे पोलिसांचे विशेष पथक गुणाट गावात आरोपीचा शोध घेत होते. ५०० हून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, श्वान पथक आणि ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर, पहाटे १.१० वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

गाडेच्या अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्या मानेवर दोरखंडासारखे व्रण आढळले आहेत. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का, हे तपासावे लागेल. आरोपीच्या जखमांबाबत अधिक चौकशी केली जाईल,” असेही त्यांनी सांगितले.

विशेष तपास पथक आणि समुपदेशक नियुक्त

या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. तसेच, पीडितेला आवश्यक मानसिक आधार मिळावा म्हणून विशेष समुपदेशकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे विशेष लक्ष

या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शहरातील टेकड्या, निर्जन स्थळे आणि डार्क स्पॉट्सचा आढावा घेतला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वारगेट एस.टी. स्थानकाच्या सुरक्षेचे ऑडिट पूर्ण

स्वारगेट एस.टी. स्थानकाच्या सुरक्षिततेबाबत बसचे दरवाजे, बेवारस वाहने, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. परिवहन विभागासोबत चर्चा करून लवकरच ठोस सुरक्षा उपाय राबवले जातील.

“अधिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींवर विशेष लक्ष” – पोलिस आयुक्त

शहरातील ज्या व्यक्तींवर एकापेक्षा अधिक बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, त्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर कडक नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

ग्रामस्थांचे पोलिसांना सहकार्य

गुणाट गावातील ४००-५०० ग्रामस्थांनी पोलिसांना मोठे सहकार्य केले. पोलिस आयुक्तांनी गावकऱ्यांचे आभार मानले असून, लवकरच त्यांचा सत्कार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकSwargateस्वारगेटswargate bus depotस्वारगेट बसस्थानक