Pune Cantonment vidhan sabha assembly election result 2024 : 'कॅन्टोन्मेंट'मध्ये चुरशीची लढत, पाचव्या फेरी अखेर सुनील कांबळेंना ४२९ मतांची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:27 AM2024-11-23T10:27:47+5:302024-11-23T10:37:18+5:30

Pune Cantonment vidhan sabha assembly election result 2024 :भाजपचे सुनील कांबळे हे येथील विद्यमान आमदार असून दोघांमध्ये सध्या कडवी झुंज सुरु आहे.

Pune Cantonment vidhan sabha assembly election result 2024 BJP Sunil Kamble is leading Congress Ramesh Bagwe is trailing | Pune Cantonment vidhan sabha assembly election result 2024 : 'कॅन्टोन्मेंट'मध्ये चुरशीची लढत, पाचव्या फेरी अखेर सुनील कांबळेंना ४२९ मतांची आघाडी

Pune Cantonment vidhan sabha assembly election result 2024 : 'कॅन्टोन्मेंट'मध्ये चुरशीची लढत, पाचव्या फेरी अखेर सुनील कांबळेंना ४२९ मतांची आघाडी

Pune Cantonment vidhan sabha assembly election result 2024 :  पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे आणि काँग्रेसचे रमेश बागवे यांच्यात थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासूनच या मतदारसंघात जोरदार टक्कर होत असून, मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर सुनील कांबळे ४२९ मतांनी आघाडीवर आहेत.

कॅन्टोन्मेंट मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१४ पासून येथे भाजपचे कमळ फुलले आहे. रमेश बागवे हे काँग्रेसचे अनुभवी नेते असून त्यांनीही या मतदारसंघाचे अनेकदा प्रतिनिधित्व केले आहे. तर भाजपचे सुनील कांबळे हे येथील विद्यमान आमदार असून दोघांमध्ये सध्या कडवी झुंज सुरु आहे.

सातव्या फेरी अखेर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपच्या सुनील कांबळे यांना 24 हजार 448 मते तर काँग्रेसच्या रमेश बागवे यांना 22 हजार 492  मते कांबळे 1156 मतांनी आघाडीवर आहे. 

इथे क्लिक करा >  महाराष्ट्र विधानसभा निकाल २ ० २ ४ 

महायुतीला लाडकी बहिण योजनेचा फायदा

राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघांचे निकाल आज जाहीर होत असून महायुतीला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीने केलेल्या योजनांचा प्रभाव मतदानावर दिसून येत आहे. विशेषतः महिलांसाठीच्या "लाडकी बहीण" योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला मतदारांचा मोठा पाठिंबा महायुतीला मिळाल्याचे चित्र आहे.

पुण्यात महत्त्वाचे निकाल बाकी

पुण्यातील कॅन्टोन्मेंटसह अन्य महत्त्वाच्या मतदारसंघांचे निकाल अद्याप बाकी आहेत. कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसने आपला गड पुन्हा काबीज केला तर भाजपला मोठा धक्का बसेल, मात्र सुनील कांबळे आघाडी कायम ठेवल्यास हा मतदारसंघ भाजपसाठी मोठा विजय ठरेल.

निकालांवर लक्ष

पाचव्या फेरीअखेर सुनील कांबळे आघाडीवर असले, तरी पुढील फेऱ्यांमध्ये कोण विजयी होणार, याकडे पुण्यातील आणि राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दुपारी अंतिम निकाल जाहीर झाल्यावर कॅन्टोन्मेंटचा कौल स्पष्ट होईल.

Web Title: Pune Cantonment vidhan sabha assembly election result 2024 BJP Sunil Kamble is leading Congress Ramesh Bagwe is trailing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.