पुणे - कोणी एकेकाळी पुणे शहर हे दाट झाडींचे, गर्द सावलींचे, टेकड्यांचे होते, असे सांगितल्यास खरे वाटणार नाही. मात्र, मागील काही वर्षांपासून शहरात वाढत चाललेल्या वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या चालू वर्षातील तीन महिन्यांची आकडेवारीनुसार दिवसेंदिवस वायू प्रदूषणाने आरोग्य धोक्यात येत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रशासनाने शहरातील प्रदूषण पातळी मोजण्याकरिता पाच ठिकाणे निवडली आहेत. यात पिंपरी-चिंचवड, कर्वे रस्ता, नळस्टॉप, भोसरी आणि स्वारगेट यांचा समावेश आहे. तीन महिन्यांतील आकडेवारीचा अभ्यास केला असता साधारणपणे शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका असल्याचे दिसून आले आहे. याविषयी अधिक माहिती देताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नितीन शिंदे म्हणाले की, उन्हाळ्यात हवी हलकी राहते. त्यामुळे धूलिकण तरंगत राहण्याचे प्रमाण वाढल्याने श्वसनास अडथळा निर्माण होतो. जास्त धूलिकणाच्या वातावरणात श्वसनाचे विविध आजार होण्याचा धोका संभवत असल्याचे पाहावयास मिळते. श्वसनास अडथळा निर्माण होण्यासारखी परिस्थिती, फुप्फुसांचे विकार असणाऱ्या व्यक्ती, लहान मुले, प्रौढ व्यक्ती, निरोगी व्यक्तींच्या श्वसनावर परिणाम करेल अशी परिस्थिती या कारणांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील प्रदूषण आकडेवारीचे वर्गीकरण केले आहे.मागील तीन महिन्यात वातावरणात तरंगणाºया धूलिकणांचे प्रमाण हे जास्तीत जास्त १८६ मायकोग्रॅम प्रतिलिटर इतके आहे. सल्फरडाय आॅक्साइड आणि नायट्रस आॅक्साइड यांचे प्रमाण अनुक्रमे ५४ आणि १४७ मायक्रोग्रॅम प्रतिलिटर एवढे आहे. वायूप्रदूषणामुळे श्वसनास त्रास होत आहे.
प्रदूषणामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 4:26 AM