पुणे : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणानिमित्त गेल्या तीन वर्षांपासून लाखो रुपए खर्च करून एफटीआयआयच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर भव्य कलात्मक प्रतिकृती साकारली जाते.मात्र यंदा प्रजासत्ताकदिनी पुणेकरांना प्रतिकृतीचे दर्शन घडले नाही.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा थेट सहभाग नसतानाही संपूर्ण खर्च शैक्षणिक हेतूसाठी दाखविल्याचे गतवर्षी उघडकीस आल्यामुळे हा उपक्रम गुंडाळण्यात आल्याचे बोलले जात आहे. एफटीआयआय प्रशासनातर्फे राष्ट्रीय दिवस साजरा करण्याच्या हेतूने 2016 साली स्वातंत्र्य दिनापासून मुख्य प्रवेशाद्वाराबाहेर विशिष्ठ संकल्पनेवर आधारित प्रतिकृती उभारणीस सुरूवात झाली. आर्ट डायरेक्शन अँंड प्रॉडकशन डिझाईन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ही प्रतिकृती उभी करण्यासाठी मेहनत घेतात असे चित्र प्रशासनाकडून भासविण्यात आले. परंतु यासाठी बाहेरून माणसे बोलविली जातात आणि विद्यार्थी थोडीफार मदत करतात. तरीही हा संपूर्ण खर्च शैक्षणिक हेतूसाठी दाखविण्यात येत असल्याचे समोर आले. यासंदर्भात एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून या मुद्यांकडे अनेकदा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कोणतेही उत्तर मिळाले नाही. केवळ देशप्रेम आणि संस्थेच्या प्रतिमा संवर्धनासाठी हा घाट घातला जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दरवर्षी स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताकदिनाच्या पंधरा दिवस आधी प्रतिकृती उभारणीचे काम सुरू होते.त्यानंतर ही कलात्मक प्रतिकृती पुणेकरांना पाहाण्यासाठी तब्बल दहा दिवस खुली ठेवली जाते. मात्र यंदा प्रतिकृती साकारण्यात आलेली नाही. त्यामुळे हा उपक्रम बंद करण्यात आला की काय? अशा स्वरूपाच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. -----------------------------------------------------------एफटीआयआच्या मुख्य प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे. ते फेब्रुवारी अखेर संपणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताकदिनानिमित्त उभी केली जाणारी प्रतिकृती मार्चमध्ये साकारली जाईल- भूपेंद्र कँथोला, संचालक एफटीआयआय---------------------------------------------------------संकल्पना प्रयोजन खर्च 1)जालियनवाला बाग स्वातंत्र्य दिन 2016 25,000मेमोरिअल स्मारक 2)सेल्युलर जेल अंदमान, प्रजासत्ताक दिन 2017 1.24 लाख रुपएनिकोबार 3) अमर जवान ज्योती स्वातंत्र्यदिन 2017 3.39 लाख रुपएइंडिया गेट4) स्वामी विवेकानंद स्मारक - विवेकानंद जयंती आणि 4.77 लाख रुपएकन्याकुमारी प्रजासत्ताक दिन 20185) साबरमती आश्रम, स्वातंत्र्य दिन 2018 3.67 लाख रुपए अहमदाबाद 6) दिल्ली राज घाट २६ जानेवारी २०१९ माहिती उपलब्ध नाही7) कारगील वॉर मेमोरियल १५ ऑगस्ट २०१९ -
प्रजासत्ताकदिनी पुणेकरांना 'एफटीआयआय'च्या कलात्मक प्रतिकृतीचे दर्शन नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 11:30 PM
उपक्रम गुंडाळल्याची चर्चा विद्यार्थ्यांचा सहभाग नसतानाही खर्च शैक्षणिक हेतूसाठी दाखविल्याचे उघड
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा सहभाग नसतानाही खर्च शैक्षणिक हेतूसाठी दाखविल्याचे उघड स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताकदिनाच्या पंधरा दिवस आधी प्रतिकृती उभारणीचे काम होते सुरू केवळ देशप्रेम आणि संस्थेच्या प्रतिमा संवर्धनासाठी हा घाट असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे