पुणे : विजांच्या कडकडाटासह शहरात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. कोथरूड परिसरात गाराही पडल्या. त्यामुळे दुपारच्या उकाड्यापासून पुणेकरांची काहीशी सुटका झाली. दुपारी किमान तापमान चाळिशीपार झाले होते. त्याने पुणेकर हैराण झाले होते. या पावसाने त्यांना दिलासा मिळाला. शुक्रवारी शहरात पावसाची शक्यता असून, त्याविषयीचा अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील उकाड्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. किमान तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. तसेच किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीही गरमी जाणवत आहे. येत्या तीन-चार दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, शहरात गुरुवारी दुपारी कडका होता. त्यानंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास आकाशात ढग जमा झाले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही भागांत गाराही पडल्या. त्यामुळे काही भागांत वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
दि. २१ ते २५ एप्रिलदरम्यान पुण्यात आकाश निरभ्र राहील आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. मेघगर्जना व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने सांगितला आहे.
शहरातील गुरुवारचा पाऊस
शिवाजीनगर : १.१ मि.मी.पाषाण : १.६ मि.मी.लवळे : ०.५ मि.मी.मगरपट्टा : १.०
शहरातील किमान व कमाल तापमान
वडगाव शेरी : २७.५ : ३९.५मगरपट्टा : २६.९ : ३८.८
कोरेगाव पार्क : २५.५ : ४०.३शिवाजीनगर : २१.१ : ३८.४
एनडीए : २०.७ : ३७.९पाषाण : २०.० : ३६.८
हवेली : १९.९ : ३७.०