शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहराच्या ८ विधानसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवार ठरले; खेळाडू जुने, सामने नवीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 13:40 IST

शहरातील अनेक ठिकाणी भाजप चे विद्यमान आमदार विरुद्ध आघाडी चे उमेदवारांसह बंडखोर मैदानात उतरले आहेत

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या दिवशी अर्थात सोमवारी (दि. ४) जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये ३०३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज छाननीनंतर एकूण ४८२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १७० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक २१ उमेदवार चिंचवड मतदारसंघात असून, पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात २०, तर हडपसर मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक लढणार आहेत.

पुणे शहरातील  ८ विधानसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवार ठरले आहेत. पुण्यातील बहुतांश मतदारसंघात खेळाडू जुने, सामने नवीन अशी परिस्थिती सद्यस्थितीत दिसते आहे. पुण्यातील अनेक मतदारसंघात काटे की टक्कर होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  हडपसर, वडगाव शेरी मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लक्षवेधी लढत होणार आहे. तर बहुचर्चित कसबा विधासनसभेत दोन जुने प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. अशातच य विधानसभा मतदार संघाच्या लढतीत मनसेही उतरल्याने तिरंगी लढत होणार असल्याचे दिसते आहे. शहरातील अनेक ठिकाणी भाजप चे विद्यमान आमदार विरुद्ध आघाडी चे उमेदवारांसह बंडखोर मैदानात उतरले आहेत.   

कसबा विधानसभा मतदार संघ  

- आमदार रवींद्र धंगेकर,काँगेस 

- हेमंत रासने, भाजप 

- गणेश भोकरे, मनसे

कोथरूड विधानसभा मतदार संघ 

- आमदार चंद्रकांत पाटील,भाजप

- चंद्रकांत मोकाटे, शिवसेना उबाठा

- किशोर शिंदे, मनसे

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ 

- आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजप 

- दत्ता बहिरट, काँग्रेस 

- मनीष आनंद, अपक्ष (काँग्रेस बंडखोर)

हडपसर विधानसभा मतदार संघ 

- आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

- प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 

- साईनाथ बाबर, मनसे 

खडकवासला विधानसभा मतदार संघ 

- आमदार भीमराव तापकीर, भाजप

- सचिन दोडके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

- मयुरेश वांजळे, मनसे 

वडगावशेरी विधानसभा मतदार संघ 

- आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

- बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष

पर्वती विधानसभा मतदार संघ 

- आमदार माधुरी मिसाळ,भाजप

- अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 

- आबा बागुल, अपक्ष (काँग्रेस बंडखोर) 

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ 

- आमदार सुनील कांबळे, भाजप

- रमेश बागवे, काँग्रेस.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीravindra dhangekarरविंद्र धंगेकरgirish bapatगिरीश बापटMadhuri Misalमाधुरी मिसाळsunil tingreसुनील टिंगरेAba Bagulआबा बागुल