पुणे शहर काँग्रेसकडून ‘फेकू दिन’ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:53 AM2018-04-02T03:53:53+5:302018-04-02T03:53:53+5:30
२०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी भाजपाने वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनाच्या निषेधार्थ कल्याणीनगर येथे पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने १ एप्रिल हा दिन (जागतिक फेकू दिन) साजरा करण्यात आला.
चंदननगर - २०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी भाजपाने वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनाच्या निषेधार्थ कल्याणीनगर येथे पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने १ एप्रिल हा दिन (जागतिक फेकू दिन) साजरा करण्यात आला.
भारतीय पकोडा उद्योग क्षेत्रात भव्य नोकरी महोत्सव हे उपाहासात्मक आंदोलन करण्यात आले. जनतेच्या खात्यातील पंधरा लाख गुल, एप्रिल फूल, बेरोजगार युवकांना देण्यात येणाऱ्या नोकºया गुल, एप्रिल फूल, नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या विदेशात गुल, एप्रिल फुल. अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
मोदी सरकार सत्तेत येण्याआधी अनेक भव्यदिव्य योजनांच्या घोषणा केल्या होत्या त्यापैकी एक महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजे वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करणार होते; पण वास्तव मात्र विरुद्ध असून, दोन लाखसुद्धा रोजगार निर्माण होऊ शकले नाहीत.
या वेळी माजी शिक्षण मंडळ अध्यक्षा संगीता तिवारी, शहर युवक महासचिव राहुल शिरसाट, संतोष पाटोळे, वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष विशाल मलके, ब्लॉक अध्यक्षा मीरा शिंदे, बालाजी गाढे, विवेक भरगुडे, नरेश नलावडे , अमोल थोरात, अभिजित रोकडे, दादाक्षी कामठे, सचिन सुंडके, हर्ष तिवारी, अक्षय राजगुरू, निखिल मोझे, प्रसाद वाघमारे, अक्षय रतनगिरी, रुनेश कांबळे, आदी युवक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शहर युवकचे सचिव राहुल शिरसाट यांनी केले.
पंधरा लाख रुपयांच्या चेकचे वाटप
उलट अमित शहा हे सुशिक्षित तरुणांना पकोडा व्यवसाय चांगला उद्योग होऊ शकतो हा पर्याय देऊ पाहतात. लाखो रुपये खर्च करून पदवी घेतलेल्यांना हा सल्ला म्हणजे शिक्षणाचा अपमान आहे, असे विधान या वेळी शहराध्यक्ष विकास लांडगे यांनी केले.
याआधी नागरिकांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याच्या पोकळ आश्वासनाच्या विरोधात प्रतीकात्मक चेक वाटप करण्यात आले होते.