Pune city Lockdown : १३ जुलैपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला का मिळतोय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 12:38 AM2020-07-19T00:38:01+5:302020-07-19T00:38:21+5:30

मात्र, लॉकडाऊनमधली खरी परीक्षा रविवारपासून सुरू होणार आहे...

Pune City Lockdown : Why did the lockdown that started on July 13 get spontaneous response from the people? Find out .. | Pune city Lockdown : १३ जुलैपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला का मिळतोय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद? जाणून घ्या..

Pune city Lockdown : १३ जुलैपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला का मिळतोय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद? जाणून घ्या..

Next
ठळक मुद्देलोकांना बाहेर पडायला कारण नव्हते...अगोदर जाहीर केल्याचाही परिणाम

पुणे : तीन दिवस अगोदर जाहीर झालेला लॉकडाऊन त्यामुळे लोकांना आवश्यक जीवनाश्यक खरेदी करण्यासाठी मिळालेला वेळ यामुळे गेल्या ५ दिवसात लोकांकडून या लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या लॉकडाऊनपेक्षा यावेळी लोकांना समजावून सांगण्याची वेळ कमी आल्याचे पोलीस अधिकाऱ्यचे मत आहे.

पुणे शहर व संपूर्ण देशात २३ मार्चपासून अचानक लॉकडाऊन जाहीर झाले़ त्यामुळे लोकांना अगोदर काहीही कल्पना नव्हती. अशा लॉकडाऊनचा लोकांना अनुभवही नव्हता त्यामुळे अचानक दिवसेंदिवस घरात कोंडून घेण्याची लोकांना सवय नव्हती. याशिवाय अत्यावश्यक खरेदीसाठी सकाळी दोन तास मुभा देण्यात आली होती. हातात पिशवी घेऊन खरेदीच्या नावाखाली लोक सकाळपासून फिरताना दिसत होती. त्यामुळे पोलिसांना लॉकडाऊनची अंमलजावणी करताना खूप त्रास झाला तसेच टिकाही सहन करावी लागली. 

१३ जुलैपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनची माहिती लोकांना अगोदरच असल्याने व आता लोकांना सवय झाली.तसेच या पहिल्या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये जीवनाश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवल्याने लोकांना घराबाहेर पडण्याचे काम राहिले नाही. त्याचबरोबर शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या यामुळे लोकांनी उर्स्फुतपणे या लॉकडाऊनला प्रतिसाद दिला असल्याचे पोलीस अधिकाºयांचे म्हणणे आहे. आता खरी परिक्षा रविवारपासून सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील लॉकडाऊनच्या काळात २३ मार्च ते ३० जून दरम्यान पोलिसांनी १८८ कलमाखाली तब्बल २० हजार ७५५ गुन्हे दाखल करुन २६ हजार ६९६ लोकांवर कारवाई केली. १४४ खाली ५० हजार ६३८ जणांना नोटीसा बजावल्या. तसेच विनाकारण बाहेर पडलेल्या ४७ हजार ८९९ वाहने जप्त केली होती.

या नव्या लॉकडाऊमध्ये पोलिसांनी तब्बल २७७ ठिकाणी नाकाबंदी, एक्झीट व इंन्ट्री पॉईटवर तपासणी केली जात होती. त्यात साधारण अडीचशे पोलीस अधिकारी आणि दीड हजार पोलीस कर्मचारी सहभागी होत होते. तसेच रात्रीच्यावेळी शंभरावर ठिकाणी नाकाबंदी केली जात होती. 

मागील लॉकडाऊनच्या वेळी मास्क बंधनकारक नव्हते़ परंतु आता मास्क बंधनकारक करण्यात आले असले तरी अनेक जण विनामास्क घराबाहेर पडताना दिसत होते.अशा २६८ जणांवर गेल्या ५ दिवसात कारवाई करण्यात आली आहे. ४ जुलैपासून विनामास्क फिरणाºया तब्बल अडीच हजार लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

गेल्या ५ दिवसात केलेली कारवाई

विना परवानगी फिरणारे १२५२

विना परवानगी वाहनावरुन फिरणारे ३१९

जप्त केलेली वाहने ६५९

विना मास्क फिरणारे २६८

१८८ खाली केलेली कारवाई १८५८

़़़़़़़़़़़

१४ हजार २१९ पास वितरित

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून १२ ते १७ जुलै दरम्यान पुणे पोलिसांनी तब्बल १४ हजार २१९ पास वितरित केले आहेत. त्यामध्ये हॉस्पिटलला जाण्याच्या कारणासाठी ८ हजार ८९६ आणि इतर अत्यावश्यक कामासाठी मंजूर करण्यात आले आहे. इतर अत्यावश्यक कामामध्ये बँक, गॅस सिलेंडर वितरण, हॉस्पिटल, फॉर्मसी, कॅन्टक्शन साईट यांचा समावेश असल्याचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी सांगितले.

़़़़़़़़़़़़़़़़

* फक्त रविवारी जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत उघडी राहणार

* सोमवारपासून फक्त जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत उघडी.

* १९ जुलैपासून ई कॉमर्स कंपन्यांना परवानगी. त्यांच्या पासची मुदत वाढविण्यात आली.

......

नागरिकांनी आजपर्यंत जो प्रतिसाद दिला व सहन राखला. तसाचा प्रतिसाद या पुढील लॉकडाऊनच्या ५ दिवसात द्यावा़ जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करु नये.फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे.

डॉ़ रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर

Web Title: Pune City Lockdown : Why did the lockdown that started on July 13 get spontaneous response from the people? Find out ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.