पुणे : शहरामध्ये नव्याने पूर्ण झालेल्या मिळकती शंभर टक्के टँक्सच्या कक्षेत आणण्यासाठी यंदा विशेष प्रयत्न करणार आहेत. यासाठी बांधकाम विभागाकडून सर्व भोगवटा पत्रक वाटप केलेल्या मिळकतीची यादी तयार केली आहे. याशिवाय इतर खासगी स्वरुपात गुंठावरीवर बांधलेल्या मिळकतींवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. याबाबत अग्रवाल यांनी सांगितले की, महापलिका प्रशासनाने सन २०१९-२० वर्षांसाठीचे तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मार्च अखेर जवळ आल्यानंतर अधिकाधिक कर गोळा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु याचा फारसा उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे यंदा पहिल्या महिन्यांपासूनच शंभर टक्के कर वसुली करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये शहरामध्ये दर वर्षी नव्याने हजारो मिळकती तयार होतात. परंतु यापैकी केवळ ३० ते ४० टक्केच मिळकती टँक्सच्या कक्षेत येतात. परंतु यंदा शंभर टक्के नविन मिळकतींना कर लावण्याचे नियोजन केले आहे. मोठ्या सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने भोगवटा पत्र दिले जाते. त्यानंतर भोगवटा पत्र दिलेल्या सर्व सोसायट्यांना कर लावला जातात. परंतु खाजगी स्वरुपात गुठावारीमध्ये बांधण्यात आलेल्या मिळकती वर्षानुवर्षे टॅक्सच्या कक्षेत येत नाहीत. तर काही ठिकाणी चार मजली बांधकाम असलेल तर दोन मजल्यासाठीच कर लावून घेतला जातो. अशा सर्व मिळकतींवर यंदा अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.--- महापालिकेच्या वतीने सन २०१८-१९ या अर्थिक वर्षांत सुमारे ५० हजार नवीन मिळकती टँक्सच्या कक्षेत आणल्या. या नवीन मिळकतीमुळे महापालिकेला तब्बल १९६ कोटी रुपयांचा मिळकत कर मिळाला. दर वर्षी सरासरी २० ते २५ हजार मिळकतींना नव्याने कर लावण्यात येतो. परंतु यामध्ये आता वाढ होत असून, यंदा नवीन मिळकतीसाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.
पुणे शहरातील नवीन मिळकती '' टॅक्स '' च्या कक्षेत आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:09 PM
महापलिका प्रशासनाने सन २०१९-२० वर्षांसाठीचे तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
ठळक मुद्देगतवर्षी ५० हजार नवीन मिळकतीतून १९६ कोटींची कर वसुली