पुणे : महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत नागरिकांना यंदा सुखद भेट देण्यात आली असून, कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी पालिकेची ३१ उद्याने मध्यरात्री बारा वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्यानांमध्ये कोजागरीचा आनंद लुटता येणार आहे. पालिका हद्दीमध्ये पालिकेची एकूण १९९ उद्याने आहेत. या उद्यानांना कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. त्यामुळे काही प्रमुख उद्यानांमध्ये नागरिकांना रात्री उशिरापर्यंत थांबता येणार आहे. बोपोडी येथील छत्रपती शिवाजी उद्यान, कै. विठोबा बाळाजी मुरकुटे उद्यान (बाणेर), श्री संत गजाननमहाराज उद्यान (गोखलेनगर), चित्तरंजन वाटिका (शिवाजीनगर), छत्रपती संभाजीराजे उद्यान (शिवाजीनगर), कमला नेहरू पार्क (एरंडवणा), भारतरत्न पंडित भीमसेन जोशी उद्यान (भुसारी कॉलनी), कै. तात्यासाहेब थोरात उद्यान (कोथरूड), लिम्का जॉगिंग पार्क (बंडगार्डन), मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर उद्यान (वाडिया कॉलेजसमोर), कै. दामोदर रा. वागस्कर उद्यान (कोरेगाव पार्क), छत्रपती शाहू उद्यान (बी. टी. कवडे रस्ता), हुतात्मा स्मारक उद्यान (येरवडा), विमाननगर जॉगर्स पार्क (विमाननगर), कै. भीमाजी कळमकर उद्यान (नगर रस्ता), कै. दामोदर रावजी गलांडे उद्यान (घोरपडी पेठ), वा. दा. वर्तक उद्यान (शनिवार पेठ), महाराणा प्रताप उद्यान (बाजीराव रस्ता), सारसबाग, मातोश्री कै. गयाबाई वैरागे उद्यान (मीरा सोसायटी), ग. प्र. प्रधान उद्यान (हडपसर), कै. विठ्ठलराव शिवरकर उद्यान (वानवडी), डॉ. राम मनोहर लोहिया उद्यान (हडपसर), स्वामी विवेकानंद उद्यान (कोंढवा), भगवान महावीर उद्यान (सुखसागरनगर), कै. वसंतराव एकनाथ बागुल उद्यान (सहकारनगर), कै. आमदार बाबूराव वाळवेकर उद्यान (सहकारनगर), शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान (कर्वेनगर), डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान (पटवर्धन बाग) ही उद्याने खुली राहणार आहेत.
कोजागरी पौर्णिमेला पुणे शहरातील उद्याने मध्यरात्रीपर्यंत राहणार खुली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 12:47 PM
पालिका हद्दीमध्ये पालिकेची एकूण १९९ उद्याने आहेत...
ठळक मुद्देउद्यानांमध्ये कोजागरीचा आनंद लुटता येणार