ही निवड चाचणी शनिवारी (२८ ऑगस्ट) छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ येथे घेण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी ९ ते ११ यावेळेत वजने घेण्यात येणार असून स्पर्धेस सायंकाळी ४ वाजता सुरुवात होणार आहे.
मुलांच्या फ्री स्टाईल प्रकारात ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ व १२५ किलो, तर मुलांच्या ग्रोकोरोमन प्रकारासाठी ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७, ९७ व १३० किलो वजनी गट असणार आहेत. मुलींच्या लढती ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२, ७६ किलो वजनी गटाच्या राहणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडू पुणे शहराचा रहिवासी असणे आवश्यक असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूचा जन्म १ जानेवारी १९९८ ते ३१ डिसेंबर २००२ दरम्यानचा असावा. खेळाडूंनी सहभागी होताना दहावी व १२ वीचे मूळ बोर्ड सर्टिफिकेट, आधारकार्ड व जन्मदाखला सोबत आणणे बंधनकारक आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी गणेश दांगट, अविनाश टकले व योगेश पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवाजीराव बुचडे यांनी केले.