शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

पुणे शहराचा कचराप्रश्न कायमच ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 4:05 AM

हडपसर येथील रोकेम प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे कचºयाच्या प्रश्नाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आरोग्याबरोबरच यात सुरक्षेचाही प्रश्न लपलेला असल्याची टीका होऊ लागली आहे. ७५० टनाच्या या प्रकल्पाच्यासमोरच महापालिका ७५० टनांचा नवा प्रकल्प सुरू करीत असून त्याच्याविरोधात आता या सुरक्षेच्या प्रश्नाची भर पडत आहे.

पुणे - हडपसर येथील रोकेम प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे कचºयाच्या प्रश्नाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आरोग्याबरोबरच यात सुरक्षेचाही प्रश्न लपलेला असल्याची टीका होऊ लागली आहे. ७५० टनाच्या या प्रकल्पाच्यासमोरच महापालिका ७५० टनांचा नवा प्रकल्प सुरू करीत असून त्याच्याविरोधात आता या सुरक्षेच्या प्रश्नाची भर पडत आहे.रोकेम प्रकल्पाला लागलेली आग अपघात नसून घातपात असल्याची टीका या प्रकल्पाच्या विरोधकांकडून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलेल्या यापुढे कचरा डंपिंगसाठी जागा मिळणार नाही, या वक्तव्याची पार्श्वभूमी यामागे आहे. महापालिकेचा नवा कचरा प्रक्रिया प्रकल्प आग लागलेल्या रोकेम या प्रकल्पाच्यासमोरच आहे. रोकेमची क्षमता ७५० टनांची आहे, मात्र त्या क्षमतेने तो चालत नाही. ३५० टन वगैरे कचºयावर तिथे प्रक्रिया होते असे सांगण्यात येते, मात्र प्रक्रिया होत नाही तर तिथे कचºयाचे फक्त क्रशिंग (भुगा) केले जाते, असे विरोधकांचे म्हणणे आहे.आता नव्या जागा मिळणार नाहीत, जुने प्रकल्प क्षमतेने सुरू नाहीत, त्यामुळे जाहीर केलेला प्रकल्पच पूर्ण क्षमतेने चालवणे भाग पडणार आहे. त्याला विरोध होत असेल तर तो कमी व्हावा, यासाठीच रोकेम प्रकल्पाला आग लावली गेली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी जाहीरपणे केला आहे. हे दोन्ही प्रकल्प प्रत्येकी ७५० टनांचे म्हणजे एकूण १ हजार ५०० टनांचे आहेत. शहरात रोज १ हजार ६०० टन कचरा जमा होतो, असे प्रशासन सांगते. याचा अर्थ सगळा कचरा हडपसरमध्येच आणून जिरवला जात आहे व ते चालू देणार नाही, असे तुपे म्हणाले. नगरसेवक योगेश ससाणे व भाजपा वगळता सर्वच पक्षांच्या हडपसरमधील कार्यकर्त्यांनी कचरा प्रकल्पाला विरोध केला आहे. कोणत्याही स्थितीत तिथे कचरा डंप करून दिला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे.लहान कचरा प्रकल्पांना नागरिकांचा विरोधप्रभागातील कचरा प्रभागातच जिरवा याला अनुषंगून महापालिकेने काही प्रभागांमध्ये ५ किंवा १० टन क्षमतेचे लहान प्रकल्प सुरू केले आहेत. त्यांनाही स्थानिक नागरिकांकडून विरोध होत असतो. काही प्रकल्प बंद आहेत, तर काहींची क्षमता कमी झाली आहे. त्यापासून वीजनिर्मिती, खतनिर्मिती अपेक्षित प्रमाणात होत नाही. ज्या संस्थांनी प्रकल्प चालवण्यास घेतले त्यातील काही संस्था सोडून गेल्या आहेत. त्यावर खर्च वारेमाप सुरू आहे. त्यापासून अपेक्षित फायदा मात्र व्हायला तयार नाही.स्वच्छ तसेच अन्य काही खासगी स्वयंसेवी संस्थांना महापालिकेने कचरा व्यवस्थापन प्रक्रियेत सामावून घेतले आहे. त्यासाठी त्यांना पैसे दिले जातात, त्याशिवाय जमा कचरा उचलणे, त्याचे वर्गीकरण करणे, कंटेनरमधून त्याची वाहतूक करणे, तो प्रकल्पापर्यंत पोहोचवणे, प्रकल्पांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे अशी अनेक कामे या घनकचरा व्यवस्थापन विभागात आहेत. कचरा व्यवस्थापनाचे महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक ७०० कोटी रुपयांचे आहे. इतकी मोठी रक्कम नियमितपणे खर्च करूनही कचरा त्याला पुरून उरला आहे, असेच दिसते आहे.घनकचरा व्यवस्थापन ही महापालिका प्रशासनासमोरची समस्या अधिक अवघड होत चालली आहे. त्यावर प्रशासन जे उपाय शोधत आहे त्या सर्व उपायांचे अपायात रूपांतर होत आहे. शहरात रोज १ हजार ६०० टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने शेकडो उपाय केले आहेत, मात्र कचरा त्या सर्व उपायांना पुरून उरला आहे.रोकेमला लागलेली आग जेसीबी यंत्राला असलेल्या वायरिंगमध्ये शॉटसर्किट झाल्यामुळे लागली, असे सांगितले जात आहे. ते शंकास्पद आहे, असे चेतन तुपे यांचे म्हणणे आहे. दरवर्षी आर्थिक वर्ष संपताना अशा आगी लागत असतात, त्यामुळे बरेच प्रश्न आपोआप मिटतात, असे मत तुपे यांनी व्यक्त केले. या आगप्रकरणाची चौकशीच केली पाहिजे, अशी मागणी तुपे यांनी केली.कचराविषयीची श्वेतपत्रिकाप्रसिद्ध करावीशहरात रोज इतका कचरा निर्माण होतो हीच बाब शंकास्पद आहे. कचरा वाढीव दाखवून खर्चही वाढीव असे चालले आहे. आजपर्यंत कधीही आग लागली नाही व मुख्यमंत्र्यांचे जागेबाबतचे वक्तव्य येताच आग लागली हे षड्यंत्र आहे. कचरा व्यवस्थापन विभागाची श्वेतपत्रिकाच प्रसिद्ध करायला हवी- चेतन तुपे, विरोधी पक्षनेतेमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य व आग याचा संबध नाहीमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य व रोकेम प्रकल्पाला लागलेली आग याचा संबंध लावणारे विद्वानच समजायला हवेत. रामटेकडी येथील ७५० टनांचा प्रकल्प आम्ही सुरू करणारच व त्यातून ११ मेगावॉट वीजनिर्मितीही होणारच. विरोधकांनी केवळ आरोप करीत राहावे.- श्रीनाथ भिमाले, सभागृहनेतेआता धोका नाहीजेसीबी यंत्रामुळे आग लागली. प्रक्रिया करून झालेला आरडीएफ हा प्रकार ज्वलनशील असतो. त्याच्याशेजारीच हा प्रकार घडला, त्यामुळे आग भडकली. अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहोचल्यामुळे ती आटोक्यात आली. सर्व अधिकारीही तिथे वेळेवर उपस्थित झाले. आता कसलाही धोका नाही.सुरेश जगताप, सहआयुक्त,घनकचरा व्यवस्थापन विभाग

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका