पुणे : राज्यात थंडीच्या लाटेने चांगलाच जोर धरला आहे. पुण्यातील एनडीए परिसरात आज (गुरुवार) राज्यातील सर्वांत कमी १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा १२ ते १८ अंशांच्या दरम्यान राहिला आहे. हवामान खात्याच्या मते, पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीची तीव्रता वाढत आहे. आज पुण्यात मगारपट्टा, वडगावशेरी आणि चिंचवड या भागांत अनुक्रमे १८.३, १८.२, आणि १७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. याशिवाय पुरंदर, इंदापूर आणि नारायणगाव या भागांमध्ये तापमान १३.४, १३.३, आणि १२.९ अंशांच्या दरम्यान राहिले.थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहणारहवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतातील उच्च दाब क्षेत्र आणि ईशान्येकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर होत असून, पुढील आठवडाभर किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात बारामती (११.८), आंबेगाव (११.९) या भागांमध्येही थंडीची तीव्रता जाणवत आहे.पुणे जिल्ह्यातील आजचे तापमान
- मगारपट्टा: १८.३
- वडगावशेरी: १८.२
- चिंचवड: १७.४
- लवळे: १७.३
- गिरीवन: १६.८
- कोरेगाव पार्क: १६.६
- खेड: १६.४
- लोणावळा: १६.१
- दापोडी: १५.७
- बल्लाळवाडी: १५.१
- भोर: १५.०
- हडपसर: १४.७
- लवासा: १४.४
- राजगुरूनगर: १३.८
- धामधरे: १३.७
- पुरंदर: १३.४
- इंदापूर: १३.३
- नारायणगाव: १२.९
- निमगिरी: १२.९
- पाषाण: १२.६
- दौंड: १२.३
- शिवाजीनगर: १२.०
- शिरूर: ११.९
- आंबेगाव: ११.९
- बारामती: ११.८
- तळेगाव: ११.५
- माळिन: ११.४
- हवेली: ११.१
- एनडीए: १०.८