पुणे : शहरात शुक्रवारी १८२ कोरोनाबाधित आढळून आले असून, २१६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ६६८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.८८ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार १४६ असून, आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८१ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०८ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २४९ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३० लाख ४५ हजार ८९१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९१ हजार ४४४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८० हजार ४२४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८७४ जणांचा मृत्यू झाला आहे.