शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांना आले राष्ट्रभक्तीचे भरते !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 7:39 PM

तब्बल २ कोटी १६ लाख ८८ हजार रूपये खर्च होणार

ठळक मुद्देफ्लॅग कोड ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे राष्ट्रध्वज उभारण्यात येणार

पुणे : शनिवारवाडा व कात्रज या दोन ठिकाणी गगनचुंबी राष्ट्रध्वज असताना, असेच राष्ट्रध्वज आपल्याही प्रभागात असावेत या 'राष्ट्रभक्ती'तून तीन नगरसेवकांना जाग आल्याने असे राष्ट्रध्वज उभारणीचे प्रस्ताव त्यांनी स्थायी समितीकडे सादर केले़. विशेष म्हणजे त्यांच्या या ध्वज उभारणी करून दाखविण्यात येणाऱ्या'राष्ट्रभक्ती'ला मंजूरी मिळाली असून, यावर पालिकेचे आता तब्बल २ कोटी १६ लाख ८८ हजार रूपये खर्च होणार आहेत़. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीची बैठकीत सदर तीन प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली़. सुनील कांबळे हे आमदारपदी निवडून आल्याने त्यांची समिती अध्यक्ष कार्यकालातील आजची शेवटची बैठक होती़. या बैठकीत त्यांनी जाताना या नगरसेवकांच्या राष्ट्रभक्तीला अनुमोदन देत हे कोट्यावधींचे प्रस्ताव मंजूर केले़. महत्वाची बाब म्हणजे समान उंचीचे, एकाच पध्दतीने उभारण्यात येणाऱ्या या तीनही राष्ट्रध्वजांसाठी तीन ठेकेदारांनी वेगवेगळ्या दराच्या निविदा सादर केल्या आहेत़. परंतू एकाच पध्दतीच्या कामासाठी ८४ लाख, ७७ लाख व ५५ लाख असे दर आले असतानाही, पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीने यावर कुठलाही आक्षेप न घेता त्यास लागलीच मंजूरी देऊ केली़. ४५ मीटर उंचींचे राष्ट्रध्वज उभारणीसाठी, येरवडा येथील नगरसेवक संजय भोसले यांच्या प्रभाग क्रमांक ‘६ ड’ मधील चिमा गार्डनमध्ये ८४ लाख ९६ हजार रूपये खर्चास, वडगाव शेरी येथील नगरसेवक योगेश मुळीक यांच्या  प्रभाग क्रमांक ‘५ क’ मधील राजा छत्रपती शिवाजी उद्यानामध्ये ७७ लाख ६१ हजार रूपये खर्चास तसेच वारजे माळवाडी येथील नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रभाग क्रमांक ‘३२ ड’ मधील ज्ञानेश्वरी उद्यानाजवळ उभारण्यात येणाऱ्या क्रीडांगण परिसरात ५५ लाख १ हजार रूपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे़. फ्लॅग कोड ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहेत़. यामध्ये ४५ मीटर उंचीचा फ्लॅग मास्ट, यु़पी़एस़, राष्ट्रध्वज वर खाली करण्यासाठी आवश्यक असणारी मोटाराईज्ड कंट्रोल सिस्टिम, आवश्यक असणारे फाऊंडेशन, २४ बाय ३६ फुट आकाराचा राष्ट्रध्वज व ३५० वॅट क्षमतेचे फ्लडलाईटस् याचबरोबर या सर्व उभारणीवर दिवसरात्र लक्ष ठेवण्यासाठी सी़सी़टी़व्ही यंत्रणाही उभारण्यात येणार आहे़. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका