शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

Video: पुण्यात नगरसेवकाची 'यमराजा'च्या वेशात एन्ट्री; पथनाट्यातून कोरोनाविषयी नागरिकांची केली जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:36 AM

कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असताना देखील नागरिकांमधली बेपर्वाई कमी होत नाही म्हटल्यावर थेट यमराजांना अवतरावे लागले.

पुणे : पुणे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.तसेच रुग्णालयात देखील रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे भयाण वास्तव आहे.तरीदेखील नागरिकांना या परिस्थितीचे गांभीर्य नसून निर्बंधांचे उल्लंघन करत ते घराबाहेर पडत आहे. पोलिसांच्या कारवाईची लोकांना भीती राहिली नाही की काय असेच दिसते आहे. त्यामुळे पुण्यात चक्क यमराज अवतरले आणि मग काय त्यांनीच कोरोना जनजागृतीचे काम हाती घेतले. 

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. त्याच बरोबर सामाजिक संस्था, कार्यकर्ते देखील यात पुढाकार घेत आहे. पण खराडी परिसरातील महापालिका नगरसेवकाने सुद्धा नागरिकांमध्ये कोरोना जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.

खराडी आणि परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत देखील नागरिक काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी साक्षात यमराजाचा वेष परिधान करून जनजागृती केली.

खराडी चंदननगर भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यावर उपाय म्हणून अनेक कारवाई देखील केली जात आहे. तसेच कोरोनाच्या संकटाची माहिती अधिक प्रकर्षाने व्हावी यासाठी पथनाट्यातून जनजागृती करण्याची वेळ आली आहे, असे भैय्यासाहेब जाधव यांनी सांगितले. यमराजाच्या सोबत चित्रगुप्ताच्या वेशात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण खैरे यांनी जनजागृती केली. युवक उपाध्यक्ष सुहास तळेकर, सागर धाराशिवकर यांनी देखील सहभाग घेतला.

 

जाधव म्हणाले, प्रशासनाकडून सांगण्यात आलेले नियम पाळले नाहीत तर नक्कीच यमसदनी जाण्याची तयारी करीत आहोत, अशाप्रकारच्या नाट्यमय जनजागृतीतून नागरिकांना सावधान केले जात आहे. काही नागरिक लॉकडाऊन असताना देखील परिसरात फिरताना आढळतात. मास्क चा वापर, सोशल डिस्टंसिंग, विनाकारण घराबाहेर फिरणे, सॅनिटायझर चा वापर अशा अनेक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे.  खुळेवाडी भागात कामगार मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, त्या भागात जनजागृती करण्यात आली. तसेच या पथनाट्यातून राजकीय फटकेबाजी देखील केेेली आहे.

१७ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीतील आकडेवारीनुसार* नगररोड क्षेत्रीय कार्यालय भागातील रुग्ण संख्या- सरकारी आणि खासगी रुग्णालयातील रुग्ण एकूण  संख्या  - ४६५४ ,*गृहविलगीकरणात उपचार घेत असलेले रुग्ण - ३२९०- सेंटर मध्ये असलेले रुग्ण -  १९१ - सरकारी आणि खासगी रुग्णालयातील रुग्ण एकूण- ४४५कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ७२८

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका