पुणे - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गुंड टिपू पठाण हा नोटा उडवत असल्याचं दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला टोळक्यांची गर्दी बघायला मिळत आहे. या व्हिडिओत टिपू नोटा उडवत डान्स देखील करत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळे दहशद निर्माण झाली आहे. दरम्यन, या व्हिडिओची काळेपडळ पोलिसांनी दाखल घेत कुख्यात गुंड टिपू पठाणवर खंडणी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याचा भाऊ एजाज पठाण याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
टोळक्यासोबत डान्स अन् पैशांची उधळण करणाऱ्या कुख्यात टिपू पठाणवर अखेर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:39 IST