शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
6
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
7
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
8
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
9
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
10
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
12
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
13
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
14
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
15
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
16
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
17
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
18
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
19
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य

धक्कादायक...! फेसबुकवर मैत्री, प्रेमात धोका, ३० लाख हडपले; मुंबई-पुणे इथं कारमध्येच गँगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 10:43 IST

- तरुणीचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ३० लाख रुपये, दोन आयफोन उकळले

पुणे : पुण्यातील आयटी अभियंता तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन बलात्कार करत, तिच्यावर आळीपाळीने चौघांनी सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर तरुणीचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ३० लाख रुपये, दोन आयफोन उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही घटना कांदिवली, मुंबई येथील फॅब हॉटेल स्प्रिंगईन, तसेच कारमध्ये घडला. याप्रकरणी, ३३ वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तमीम हरसल्ला खान (रा. कांदिवली) आणि त्याचे अन्य तीन मित्र अशा चौघांच्या विरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, फसवणूक, अपहार, धमकावून मारहाण, अशा भादंविमधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, हा प्रकार कांदिवली येथे घडला असल्यामुळे गुन्हा पुढील तपासासाठी कांदिवली पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची कर्नाटकातील आहे. आयटी क्षेत्रात नोकरी करत असल्यामुळे ती पुणे शहरात वास्तव्यास आहे. २०२१ मध्ये तिची फेसबुकच्या माध्यमातून आरोपी खान याच्या सोबत ओळख झाली होती.

खान याने त्याच्या वडिलांचा मोठा बांधकाम व्यवसाय असून, तो सर्व पाहत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोघांची ओळख वाढत गेली. लग्नाच्या आमिषाने खान याने तरुणीला आपल्या जाळ्यात खेचले. त्यातूनच तरुणी खान याला भेटण्यासाठी कांदिवली येथे गेली होती. येथील फॅब हॉटेलमध्ये दोघे भेटले. त्यावेळी खान याने तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याने तरुणीवर बलात्कार केला. खान याने तरुणीला आपल्या कारमध्ये नेऊन मुंबई आणि पुणे येथे बलात्कार केला. खान तरुणीवर कारमध्ये अत्याचार करत असताना, त्याने आपल्या अन्य तिघा मित्रांना बोलावून घेतले. त्या तिघांनी तरुणीवर आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केला.

आरोपींनी तरुणीचे अत्याचार करतानाचे काढलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीकडून सुरुवातीला दहा लाख रुपये रोख, तसेच विविध बँकेकडून कर्ज काढून १८ लाख रुपये, असे ३० लाख रुपये उकळले. एवढेच नाही, तर तरुणीच्या क्रेडिट कार्डवरून दोन आयफोन खरेदी केले. दरम्यान, तरुणीने दिलेले पैसे खान याच्याकडे परत मागितले असता, त्याने तरुणीला मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कांदिवली पोलिस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याArrestअटकPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड