शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'मी पक्षाचा अध्यक्ष..टी शर्ट काढून मसाज कर नाही तर..' धमकी देणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:08 IST

- कामगार महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करत व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तिघांना अटक 

- पांडुरंग मरगजे

धनकवडी :  मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे़ तू टॉप काढून मसाज कर, नाही तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन असे सांगून धनकवडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलेचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी गोळा करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.रोहित गुरुदत्त वाघमारे (वय २९, रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी, सध्या रा. पंचशिल तरुण मंडळ, भिमनगर, उत्तमनगर), शुभम चांगदेव धनवटे (वय २०, रा. गणराज कॉम्प्लेक्स, उत्तमनगर), राहुल ज्ञानेश्वर वाघमारे (वय ३५, रा. एसआरए बिल्डिंग, केळेवाडी, पौड रोड, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ४० वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ फेब्रुवारी रोजी घडला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित वाघमारे हा एका मित्राला घेऊन धनकवडीतील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने शर्ट काढून खुंटीला टांगून ठेवताना खिशामध्ये मोबाईल चालू ठेवला होता. मसाज करत असताना रोहित वाघमारे याने या महिलेला अंगावरील टॉप काढण्यास सांगितले. त्यांनी त्यास नकार दिल्यावर मी सांगितले तसे केले नाहीस तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन, असे सांगून जबरदस्तीने त्यांना टॉप काढायला लावून उपचार करुन घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने २ ते ३ जण तो घेऊन आला. त्याने फिर्यादी महिलेला मसाज करताना नकळत काढलेला व्हिडिओ दाखवून २० हजार रुपये दे, नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर काऊंटरमध्ये असलेले ८०० रुपये जबरदस्तीने घेऊन ते निघून गेले. त्यानंतर भीतीमुळे त्यांनी ही बाब कोणाला सांगितली नाही. महिला आयोगाकडे त्यांनी तक्रार अर्ज केला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण करुन संशयित आरोपींचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेऊन पोलिसांनी तिघांना अटक केली. 

तिघेही सराईत गुन्हेगार : खंडणी उकळण्याचा त्यांचा धंदामसाज पार्लरमध्ये जाऊन नकळत व्हिडिओ काढून खंडणी उकळण्याचा त्यांचा धंदा असल्याचे समोर आले असून, त्यांनी शहरातील वेगवेगळ्या ७ ते ८ ठिकाणी असा प्रकार केल्याची कबुली दिली आहे. रोहित वाघमारे याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तसेच रोहित व शुभम धनवटे यांच्याविरुद्ध बीडमधील अंभोरा पोलीस ठाण्यात तसेच पाथर्डी पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हे दाखल आहेत. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र