शहरं
Join us  
Trending Stories
1
26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा भारतात दाखल; विमानतळावरुन NIA ने घेतले ताब्यात
2
“बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघेही मला आदराच्या स्थानीच आहेत”: छगन भुजबळ
3
हॉट एअर बलून शोमध्ये भयंकर घटना! ८० फुटांवरून कोसळला, जागेवरच सोडला जीव
4
जिद्दीला सलाम! असह्य वेदना, स्ट्रेचरवरून नेलं मैदानाबाहेर पण पुन्हा येऊन मॅथ्यूजने ठोकलं शतक
5
पत्रकाराच्या हत्येनंतर ३४ दिवसांनी खुलासा; सुपारी देणारा निघाला मंदिराचा पुजारी
6
IPL : मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटर्सला फिटनेसचे धडे देतो प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवरा, तुम्ही ओळखलं का?
7
चीन उदार झाला, दान म्हणून ५ टक्क्यांचा डिस्काऊंट दिला...! भारतात टीव्ही, फ्रिज, मोबाईल स्वस्त होणार
8
Mhada: 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य', म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू
9
तो आमचा नव्हेच! तहव्वूर राणा भारतात येण्याआधीच पाकिस्तानची'झटका'झटक, म्हणे...
10
Hanuman Jayanti 2025: राहू-केतूची अशांती मागे लागू नये म्हणून हनुमान जयंतीला तुळशीचे रोप आणा व दान करा!
11
"ममता बॅनर्जींसाठी चांगला पती...!" सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचं वादग्रस्त विधान, TMC भडकली
12
"मी खुनात नाही, खंडणीही मागितली नाही"; वाल्मीक कराडचा कोर्टात अर्ज; आजच्या सुनावणीत काय घडलं?
13
"तू १०.३० पर्यंत जेलमध्ये असशील..."; पत्नीनं ठेवला स्टेटस, भीतीपोटी पतीनं जीवन संपवलं
14
Instagram वर येतंय मजेदार फीचर! रील्स करता येणार लॉक, पासवर्ड माहित असेल तरच...
15
१०० वर्षांनी हनुमान जन्मोत्सवाला गजकेसरीसह ६ राजयोग: ७ राशींना वरदान काळ, अपार लाभच लाभ!
16
IPL 2025: संजू सॅमसनला मोठा दणका, RRच्या इतर खेळाडूंनाही लाखो रुपयांचा दंड, नेमकं काय चुकलं?
17
७ वर्षांत दुसऱ्यांदा ब्रेस्ट कॅन्सर, तरीही हिंमत हरली नाही अभिनेत्याची पत्नी, म्हणाली- "आता बरी होतेय..."
18
कसलं ते मंगेशकर कुटुंब, लुटारुंची टोळी आहे; 'दीनानाथ' रुग्णालयातील घटनेवरून विजय वडेट्टीवार यांचं विधान
19
तुम्हीच जबाबदार आहात, बलात्कार प्रकरणातील पीडितेला उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितले; आरोपीला जामीन मंजूर
20
जेलमध्येच राहणार, ना जामीन, ना पॅरोल मिळणार, पण तहव्वूर राणाला फाशीही नाही होणार, असा आहे कायदेशीर पेच

'खर्च परवडत नाही..'आईनेच जुळ्या मुलांचा घेतला बळी; लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:22 IST

पाण्याच्या टाकीत बुडवून दोन चिमुकल्यांना मारले, स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : लग्नाच्या जवळपास १० वर्षांनी उपचारानंतर घरात टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून चिमुकल्या जुळ्यांचे हसणे-रडणे ऐकायला मिळाले. इतके सगळे करूनही चिमुकल्यांची वाढच होत नाही आणि उपचाराचा खर्चही परवडत नाही म्हणून १० वर्षे मातृत्वासाठी आतुर असलेल्या मायला परिस्थितीने अचानक कैदाशीण बनवले. पोटच्या २ महिन्यांच्या जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारले आणि स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. ८) सकाळी पावणेसातच्या सुमारास महिलेच्या माहेरी थेऊरमधील दत्तनगर भागातील काकडे वस्तीत घडली. दरम्यान, पैशांअभावी वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून पुण्यात गर्भवती महिलेचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, चिमुकल्यांच्या उपचाराचा खर्च परवडत नाही म्हणून आईने आज दोन चिमुकल्यांचा बळी घेतला. या दोन्ही घटना सरकार आणि समाजाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या असून, आरोग्य सेवेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, याकडे लक्ष वेधणाऱ्या आहेत.

याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (३५, रा. मीरजवाडी, आष्टा, जि. सांगली) या महिलेला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेच्या भावानेच फिर्याद दिली आहे.मुलांची योग्य वाढ होत नसल्याने आणि त्याचा खर्च परवडत नसल्याने घरात ताणतणाव होता. त्यातूनच प्रतिभा मंगळवारी सकाळी दोन्ही बाळांना घेऊन घराच्या छतावर गेली. तिने गच्चीवरील प्लास्टिकच्या पाण्याचे टाकीमध्ये दोन्ही बाळांना बुडवले व स्वतः त्यात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.हा प्रकार समोरील बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शिवशंकर स्वामी यांनी बघितला.त्यांनी प्रतिभाचा भाऊ प्रल्हाद लक्ष्मण गोंडे यांना फोनद्वारे या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर प्रल्हाद गोंडे यांनी घराच्या छतावर जाऊन प्रतिभा आणि दोन्ही मुलांना पाण्याच्या बाहेर काढले. तोपर्यंत दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षालाही कळवली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रल्हाद गोंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत आरोपी प्रतिभा याला खून केल्याप्रकरणी अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.

जुळ्या मुलांची वाढ योग्य प्रकारे होत नसल्याने, घरात ताणतणाव होता. खर्चदेखील खूप होत असल्याने मानसिक तणावातून आरोपीने हे कृत्य केले. आम्ही आरोपी महिलेला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.- डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपायुक्त 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिला