विमाननगर - चैनीसाठी घरफोड्या करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या ‘हिम्मतवान’ सराईत चोरट्याला चंदननगर पोलिसांनी सापळा रचून गुन्हा दाखल झाल्यावर, केवळ दोन तासांच्या अवधीत अटक केली. उंची राहणीमान ठेवून नागरिकांची दिशाभूल करणºया हिम्मत रिबेलो या सराईत चोरट्याला या गुन्ह्यात चंदननगर पोलिसांनी शिताफीने पकडले. २०१२ ते २०१५ या कालावधीत हिम्मत याला येरवडा पोलिसांनी घरफोडीच्या २६ गुन्ह्यांत अटक केली होती.चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना मुंढवा रोड येथील एटलास ड्रिम सोसायटी येथे रात्रीच्या सुमारास फ्लॅटमध्ये प्रवेश करून फ्लॅटमधील सोन्याचे-हिºयाचे दागिने, परकीय चलन असा सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल घरफोडी करणाºया सराइतास चंदननगर पोलिसांनी दोन तासांत अटक केली. या प्रकरणी तनय गोविंद अगरवाल (वय ३० रा. एटलास सोसायटी चंदननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी हिम्मत पीटर डी रिबेला (रा. वाडेश्वरनगर, चंदननगर) यास अटक करून गुन्ह्यातील सोन्याचे, हिºयाचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हिम्मत याला न्यायालयात हजर केले असता, त्याला १४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.हिम्मत हा घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी आहे. गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक, उपनिरीक्षक संदीप साळुंखे, उपनिरीक्षक श्रीधर भोसले यांच्या पथकाने या गंभीर गुन्ह्याचा तपास केला.आरोपी हिम्मत याच्यावर येरवडा पोलीस स्टेशन येथे यापूर्वी घरफोडी व चोरीचे २६ गुन्हे दाखल असून, आणखी तीन गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली. एटलास सोसायटी येथे रात्रीच्या सुमारास अग्रवाल यांच्या घरात घरफोडी झाल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली होती. त्यांच्या बंद फ्लॅटमधून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या चांदीचे दागिने, हि-याचे दागिने, परकीय चलन व इतर मुद्देमाल चोरला होता.४या गुन्ह्याचा प्रकार हा गंभीर स्वरूपाचा होता, याप्रकरणी अधिक तपास करताना हा गुन्हा सराईत आरोपी हिम्मत यानेच केला असावा, अशी शंका चंदनगर पोलिसांना होती. त्यानुसार घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी हिम्मत याचा शोध सुरू करण्यात आला होता. चंदननगर पोलिसांनी दोन तासांत हिम्मत याला सापळा रचून अटक केली. अधिक तपासात हिम्मत याने घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे हिºयाचे दागिने, तर मुद्देमाल असा सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याच गुन्ह्यातील आणखी चाळीस हजार रुपायांचा मुद्देमाल, तसेच आणखी दोन गुन्हे केल्याची कबुली त्याने या वेळी दिली
घरफोडीची दोन तासांत उकल, सराईत आरोपींकडून तीन गुन्हे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 3:30 AM