शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
2
वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती देण्याचा विचार, सर्वाेच्च न्यायालयाने केले स्पष्ट
3
आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई; नागपूर महानगरपालिकेने मागितली बिनशर्त माफी
4
निकाल देईपर्यंत कुणाल कामराला अटक करू नका; शिंदेंवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हायकोर्टाचा आदेश
5
१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?
6
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
7
केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल! कर्मचारी खर्चात कपात; सुधारणांवर फोकस
8
Mumbai Metro 2B: मानखुर्द-चेंबूर मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी, मेट्रो कुठे जोडली जाणार?
9
दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल
10
राज्यात ‘आनंद गुरुकुल’! सुरू करणार ८ निवासी शाळा, शालेय शिक्षण विभागाचा संकल्प
11
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
12
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
13
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
14
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
15
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
16
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
17
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
18
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
19
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
20
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

येरवड्यात १८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; वडिलांनी केले पोलिसांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:24 IST

मुलाला धमक्या येत असल्याची माहिती दिली होती, पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही

लोहगाव - येरवडा येथील पंचशील नगरसमोर असलेल्या एका पडक्या घरात १८ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. साहिल विलास कांबळे (वय १८, मूळ रा. देवरूकपूर बौद्धवाडी, जि. रत्नागिरी, सध्या रा. धानोरी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा प्रकार १७ मार्च रोजी येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ घडला.  साहिल कांबळे हा शनिवार पेठ येथील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत होता. तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विश्रांतवाडी शाखा प्रमुख विलास कांबळे यांचा मुलगा होता. १६ मार्च रोजी साहिलला धमकीचे फोन आल्याने त्याने विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या साप्रस चौकीत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.  दरम्यान, ही आत्महत्या नव्हे, खून आहे वडिलांनी आरोप केला आहे. १७ मार्च रोजी येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, मनोरुग्णालयाजवळील पडक्या घरात साहिलचा मृतदेह दोरीने लटकलेला आढळला. मात्र, त्याचे पाय जमिनीला टेकलेले होते आणि तोंडाला माती लागलेली होती. त्यामुळे ही आत्महत्या नसून त्याचा खून करण्यात आला असल्याचा आरोप वडील विलास कांबळे यांनी केला आहे.  पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानेच मुलाचा बळीविलास कांबळे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हटले की,"मुलाला धमक्या येत असल्याची माहिती दिली होती, पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. धानोरी, विश्रांतवाडी आणि येरवडा परिसरात गुन्हेगारी टोळ्या सक्रीय असून पोलिस कारवाई करत नाहीत. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असून, पोलीस मूग गिळून गप्प आहेत." असेही ते म्हणाले  नातेवाईक आणि स्थानिकांचा संतापसाहिलच्या संशयास्पद मृत्यूनंतर नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास करून पोलिसांनी योग्य कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या येरवडा पोलिस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसYerwadaयेरवडाCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या