शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

Pune Crime Swargate bus depot : आमची भूमिका - आता बस..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:12 IST

स्त्री म्हणजे तिचे फक्त शरीर, असे वाटणाऱ्या या नराधमांना वेळीच ठेचले पाहिजे. ते ठेचले गेले नाही, म्हणून ही वेळ आली

- संजय आवटे, संपादक अशा बातम्या प्रसिद्ध करतानाही आम्हाला लाज वाटते. या बातम्या प्रसिद्धच करू नये, असे कैकदा मनात येते. पण, करणार काय? वास्तव कितीही भयंकर असले, तरी त्यापासून आपल्याला पळ कसा काढता येईल ? हेच वर्तमानाचे वास्तव असेल, तर आम्हाला या वर्तमानाची शरम वाटते. आपल्याला आपलीच शरम वाटावी, अशी ही बातमी आहे. या मोकाट पशूंचा ‘माणूस’ कधी होणार ? स्त्री म्हणजे तिचे फक्त शरीर, असे वाटणाऱ्या या नराधमांना वेळीच ठेचले पाहिजे. ते ठेचले गेले नाही, म्हणून ही वेळ आली आहे.रयतेच्या राजाचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भाळी लावलेल्या एका बसमध्ये अशी घटना घडतेच कशी ? पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर असताना, नराधमाची अशी हिंमत होतेच कशी? स्वारगेट बस स्टॅंड हे देशभरात ठाऊक असलेले स्थानक. नेहमीच गर्दीने गजबजलेले बस स्थानक. इथे एवढी किमान सुरक्षा व्यवस्था असू नये ?, आपल्या सगळ्या यंत्रणा मग करतात तरी काय? या बस स्थानकाच्या परिसरात काय-काय घडते, त्याचे तपशील आता समोर येऊ लागले आहेत. एसटी प्रशासनाला ते समजत नाही ?, पोलिसांना हे दिसत नाही ? एरव्ही दिसेल त्या गाडीला शिट्टी मारणाऱ्या पोलिसांना ही धोक्याची घंटा ऐकू येत नाही ?मुळात स्त्रीकडे केवळ ‘शरीर’ म्हणून बघणारी नजर असते, तेव्हाच या अशा घाणेरड्या घटना घडतात. लहान बालिकेपासून वृद्धांपर्यंत कोणी त्यापासून सुटलेले नाही. रस्त्यावर स्त्री असुरक्षित आहे, असे मानावे, तर अनेक कार्यालयांमध्ये काय चित्र आहे ? सार्वजनिक ठिकाणे सोडा, घरात काय वेगळी अवस्था आहे? जिथे गर्भाशयातच ‘ती’ असुरक्षित असते, तिथे इतर ठिकाणांचे काय?तिला असुरक्षित जे करतात, त्यांना जेरबंद करण्याऐवजी आपण करतो काय? आपण तिलाच बंद करून टाकतो. तिलाच डांबून टाकतो. सातच्या आत घरात यायला तिला भाग पाडतो आणि तिला असुरक्षित करणारे मात्र रात्रभर मोकाट. ही मानसिकता बदलायला हवी. स्त्रीला असुरक्षित करणारी ही नजर ठेचायला हवी.या मुलीचे कौतुक करायला हवे. कारण, तिने लगेच पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवली. ज्याने अत्याचार केला, त्याला बेइज्जत करण्याऐवजी अनेकदा जिच्यावर बलात्कार झाला, तिच्याच चारित्र्याविषयी बोलले जावे, यासारखी निर्लज्ज गोष्ट नाही. अनेक मुली-महिला अत्याचार होऊनही गप्प बसतात आणि अशा नालायकांचे फावते. मुलींनी हिंमत दाखवली पाहिजे. हे असले नराधम ओळखले पाहिजेत. काही घडत असेल, तर त्वरेने बोलले पाहिजे. मौन सोडले पाहिजे. असे नराधम गजाआड जाण्यासाठी समाजानेही या मुलींना साथ दिली पाहिजे.पुण्याला सावित्रीमाईंचा वारसा आहे आणि डॉ. आनंदीबाईंचाही. जिथे राजमाता जिजाऊंनी शिवरायांसारखा रयतेचा राजा घडवला आणि ज्ञानदेव-तुकारामांनी इथेच समतेचा संदेश दिला. इथेच तर स्वातंत्र्यासाठी कस्तुरबांनी आपला जीव दिला. याच पुण्यात धोंडो केशव कर्व्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी हुजुरपागेचे बीज रोवले. इथेच तर पंडिता रमाबाईंनी व्यवस्थेला खडे बोल सुनावले. त्या पुण्यात हे घडावे ? आज नाही. वारंवार हे घडत आहे. प्रत्येकवेळी आक्रोश होतो. पण, व्यवस्था बदलत नाही. पाण्यावर तरंग नाही.एवढे कोटी आले आणि मेट्रो आली, म्हणून शहराचा विकास होत नसतो. ज्या शहरात पहाटे-पहाटे अशी काळरात्र येते, त्या शहराचे काही होऊ शकत नाही. आता आयुष्याच्या मशाली पेटवल्या नाहीत, तर उद्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात फक्त काळरात्र असणार आहे !

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLokmatलोकमतswargate bus depotस्वारगेट बसस्थानक