राजगुरुनगर - राजगुरुनगर शहरात धक्कादायक घटना घडली असून, लग्नास नकार दिल्याने २० वर्षीय तरुणीवर तरुणाने चाकूने गंभीर हल्ला केला. विशेष म्हणजे हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवरही चाकूने वार करत स्वतःला गंभीर जखमी केले. ही घटना २१ मार्च रोजी घडली. नेमके काय घडले ?राजगुरुनगर शहरालगत पडाळवाडी (ता. खेड) येथील गणेश रेसीडेन्सीमध्ये पीडित तरुणी आपल्या आई आणि बहिणीसोबत राहते. शुभम अनिल खांडगे (वय २८, रा. पिंपळगाव वाणी, ता. जुन्नर) हा पीडित कुटुंबाचा दूरचा नातेवाईक आहे. २१ मार्चच्या सकाळी शुभम खांडगे बाथरूममध्ये घुसला आणि तरुणीला जबरदस्तीने लग्नासाठी तयार होण्यास धमकावले. मात्र, तिने नकार दिल्याने रागाच्या भरात किचनमधील लोखंडी चाकू घेऊन तिच्या पोटावर आणि मानेवर सपासप वार केले. तिची आई बचावासाठी आली असता, तिच्यावरही चाकूने वार करण्यात आला. यानंतर, स्वतःलाही गळ्यावर वार करून शुभम खांडगे गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरूया घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सिसोदे करत असून, आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लग्नास नकार दिल्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला; आरोपीने स्वतःलाही केले गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:47 IST