पुणे : चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून तरुणीची प्रकार धनकवडी परिसरात समोर आला आहे. ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने तरूणीकडून ७ लाख २५ हजार रूपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धनकवडी परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, हा प्रकार २९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान घडला आहे. तरुणीला ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास त्याचा चांगला मोबदला मिळेल. हे काम पार्ट टाइम करता येईल असे सांगितले. त्यानंतर सुरुवातीला मोबदला देऊन तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळे टास्क देऊन त्यासाठी प्रीपेड, व्हीआयपी अकाउंट या नावाखाली पैसे घेऊन तरुणीची फसवणूक केली.
याप्रकरणी अज्ञात संबंधीत आरोपींवर फसवणूक व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपस वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळाळे करत आहेत.