शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

पुणे-दौंड लोकल मार्गाची तपासणी सुरू

By admin | Published: September 30, 2016 4:45 AM

दौंड-पुणे लोकल मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाची तपासणी गुरुवारी सकाळपासून दौंड रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात आली. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत दौंड

पुणे : दौंड-पुणे लोकल मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाची तपासणी गुरुवारी सकाळपासून दौंड रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात आली. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत दौंड स्थानकातील कामाची तपासनी केल्यानंतर, तीन वाजून ४० मिनिटांनी हे पथक विशेष गाडीसह पुण्याकडे रवाना झाले. त्यानंतर पाटस- कडेठाण स्थानकांची तपासणी करून, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास केडगाव स्थानकात ही तपासणी थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. रेल्वेसुरक्षा आयुक्त सुशील चंद्रा यांच्या उपस्थितीत ही तपासणी सुरू आहे. गेली अनेक वर्षे या मार्गावरील लोकलसाठी विद्युतीकरणाचे काम सुरू होते. हे काम मागील आठवड्यात पूर्ण करण्यात आले असून, या मार्गावर तीन दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनकडून इलेक्ट्रिक लोको (विद्युत प्रवाहावर चालणारे इंजिन) सोडण्यात आले होते. त्याची चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर या कामाच्या तपासणीसाठी रेल्वे विभागास भूपृष्ठ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने आयुक्त चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी सकाळपासून दौंड स्थानकातील कामाची तपासणी केली. या वेळी पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांच्यासह गौरव झा, कृष्णाथ पाटील यांच्यासह अभियंत्यांचे पथकही उपस्थित होते. दरम्यान, ही विशेष गाडी केडगावपर्यंत पोहचल्यानंतर रात्री अंधार झाल्याने पथकाकडून तपासणी थांबविण्यात आली असून शुक्रवारी (दि. २९) रोजी सकाळी नऊच्या सुमारास हे पथक पुण्यातून केडगावकडे रवाना होणार आहे. पुणे-जयपूर एक्स्प्रेसला तीन जादा डबेसुट्यांच्या कालावधीत राजस्थानमध्ये जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून गाडी क्रमांक १२९४० जयपूर-पुणे-जयपूर एक्स्प्रेस या गाडीला प्रथमदर्जा श्रेणीचे तीन जादा वातानुकूलित डबे जोडण्यात येणार आहेत. जयपूरहून पुण्याकडे येताना १ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीसाठी, तर पुण्याहून जयपूरकडे जाताना २ आॅक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.या मार्गावर रेल्वे सुरक्षा आयुक्त तपासणी करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुपारनंतर केडगाव रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. या मार्गावर लोकलचा रेक धावणार असल्याची धारणा झाल्याने ही गाडी पाहण्यासाठी हे नागरिक जमलेले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आलेली ही तपासणी गाडी अवघे दोन मिनीटच स्थानकावर थांबली. या वेळी रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्यासह इतर प्रवासी संघटनाचे प्रतिनिधीही केडगाव स्थानकावर उपस्थित होते. तसेच त्यातील कोणताही अधिकारी नागरिकांशी बोलला नाही. अधिकारी गाडीतून उतरताच ही गाडी पुण्याकडे रवाना झाली. त्यामुळे स्वागतासाठी जमलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. या वेळी प्रवासी संघटनांनी लोकल बाबत असलेली निवेदनेही आणली होती. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याने ती स्वीकारली नसल्याचे हर्षा शहा यांनी सांगितले.