पुणे : विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे-दौंड मार्गावर पुणे-लोणावळाप्रमाणे लोकल सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेकडून सातत्याने बोलले जात होते. मात्र, अद्याप पुणे-दौंड लोकलबाबत रेल्वे प्रशासन प्राधान्याने विचार करीत नसल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी पुणे-दौंड मार्गावर लोकल सुरू करण्यासाठी अनेक तांत्रिक बाबी असल्याचे सांगत हात वर केले. शर्मा यांनी शनिवारी पुणे ते दौंड मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना विविध विषय मांडले. पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय व इतर वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. शर्मा म्हणाले, की पुणे-लोणावळा मार्गावरील ईएमयू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) लोकलचा आकार इतर गाड्यांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे दौंड मार्गावर ही लोकल चालविणे तितके सोपे नाही. त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येऊ शकतात.
पुणे-दौंड लोकल अद्याप अधांतरी
By admin | Published: January 08, 2017 3:34 AM