लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मध्य रेल्वेच्या वतीने पुणे-दौंड-पुणे दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी मध्य रेल्वेने पुणे-दौंड-पुणे दरम्यान पॅसेंजर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-दौंड दरम्यान पुण्याहून सकाळी ७.०५ मिनिटे आणि १८.४५ मिनिटांनी दौंडकडे रवाना होतील. त्याचवेळी दौंडहून सकाळी ७.०५ मिनिटे व १८.१५ मिनिटांनी पुण्याकडे येणार आहे. अनलॉकनंतरही अजून सामान्यांसाठी लोकल सुरु केलेली नाही. पुणे-दौंड दरम्यान सध्या केवळ सकाळी व सायंकाळी दोन पॅसेंजर गाड्या सोडण्यात येत आहेत. त्याही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच आहेत. त्यासाठी पोलिसांनी दिलेल्या ‘क्यूआरकोड’ असलेल्यांनाच सध्या तिकीट दिले जात आहे.
येत्या २६ जानेवारीपासून या चारही पॅसेंजर सुरू करणार असल्याचे मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाने याबाबतचे आदेश काढले आहे. याबाबत पुणे रेल्वे विभागाकडे चौकशी करता अजून रेकची उपलब्धता तसेच अन्य बाबींची पुर्तता केल्यानंतर अधिकृतपणे या पॅसेंजरची तारीख जाहीर करणार आहे.