पुणे : देवगड हापूसच्या नावाने होणारी तोतयागिरी व बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी 'हापूस (अल्फोन्सो)' च्या भौगोलिक संकेत युनिक आयडीद्वारे जीआय टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर प्रणाली बनवली आहे. यामुळे आता नैसर्गिक उत्पादन असलेला खरा देवगड आंबा ओळखता येणार आहे. या युनिक आयडी कोड प्रणालीद्वारे देवगड आंब्यांची गोड चव ग्राहकांना चाखता येणार आहे.देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने या वर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर 'टॅपर प्रूफ युआयडी सील' सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नैसर्गिक देवगड आंबा ओळखता येणार आहे, अशी माहिती देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक सदस्य ॲड. ओंकार सप्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा खास युनिक स्टिकर लावणे बंधनकारक असेल आणि असे युआयडी असलेले आंबेच 'देवगड हापूस' किंवा 'देवगड अल्फोन्सो' म्हणून विक्री करता येणार आहे.या उपक्रमामुळे देवगड हापूसच्या नावाखाली सर्रास होणारी बनावट आंब्यांची विक्री पूर्णतः बंद होईल. ग्राहकांना अस्सल देवगड हापूस आंबेच मिळतील, असा संस्थेने विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आपल्याकडील आंबा ‘देवगड’चाच आहे का, हे तपासण्यासाठी ग्राहकांनी 91 9167 668899 या क्रमांकावर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फोटो पाठवावा.आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फायदागेल्या तीन दशकांपासून इतर भागांतील निकृष्ट दर्जाचे आंबे सर्रास देवगड हापूस म्हणून विकले जात आहेत. त्यामुळे देवगडमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, त्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणामदेखील होत आहेत. त्यामुळेच 'हापूस (अल्फोन्सो)' च्या जीआय टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर या नात्याने प्राप्त होणाऱ्या अधिकारांचा वापर करून संस्थेने हा युनिक कोट सक्तीचे करण्याचा हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत ३०८ शेतकरी जोडले गेले असल्याचे, ओंकार सप्रे यांनी सांगितले.
अरे वा..! देवगड हापूस आंबा घेताना आता फसवणूक अशक्य, स्पेशल कोडद्वारे पारख…
By अजित घस्ते | Updated: March 18, 2025 19:37 IST