शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

Pune: डिंभे धरणात अवघा चार टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणलोट क्षेत्रात पाणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 12:51 PM

शेतकऱ्यांनी गाळपेरीवर घेतलेली पिके अडचणीत सापडली असून, धरणाच्या आतील बाजूस पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे....

डिंभे (पुणे) : येथील धरणातील पाणीसाठा १,५०४ दशलक्ष घनफुटावर आला आहे. आज या धरणात अवघा ४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सिंचनासाठी डाव्या कालव्याद्वारे ६०० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे पाणलोट क्षेत्रातील घोडनदीपात्र रिकामे झाली असून, पाणीपुरवठा योजना धोक्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी गाळपेरीवर घेतलेली पिके अडचणीत सापडली असून, धरणाच्या आतील बाजूस पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या डिंभे धरणातील पाणीसाठ्यात यंदा झपाट्याने घट झाली आहे. आजमितीस या धरणात केवळ ४% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मागील या तारखेला धरणात १४ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. सध्या धरणातून डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी ६०० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे धरणाची पाणीपातळी कमी होत असून धरणाच्या आतील बाजूस आसणारे घोडनदीपात्र झपाट्याने रिकामी होत आहे. यामुळे डिंभे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या आदिवासी भागातील पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. डिंभे धरणाच्या पाण्यावर अवलंबून धरणाच्या आतील भागातील शेतकऱ्यांनी गाळपेरीतील उन्हाळी बाजरी, फरशी, मका, जनावरांसाठी हिरवा चारा ही पिके घेतली आहेत. मात्र, धरणातील पाणीसाठा झपाट्याने खाली जात असल्यामुळे ही पिके धोक्यात आली असून, शेतकरीवर्ग अडचणी सापडला आहे.

दूषित पाणी पिण्याची वेळ आली -

नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून, यामुळे या भागात आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. एकंदरीतच डिंभे धरणातील पाणीसाठ्याने यंदा तळ गाठला असून, आजमितीस या धरणात केवळ ४ टक्के इतका निश्चयांकित पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. घोडनदी पात्र कोरडे पडल्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणे