पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी मंगळवार (दि.4) रोजी सकाळी 9 वाजता अल्पबचत भवन येथे होणार आहे. या निवडणुकीत बँक पतसंस्थांसाठीचा 'क' गट आणि हवेली मुळशी तालुक्यातील' अ 'वर्ग सोसायटी गटातील निकालाबद्दल मोठी उत्सुकता आहे. तर शिरूरचे आमदार अशोक पवार यांची नव्याने एन्ट्री होणार का याबाबत देखील लोकांमध्ये उत्सुकता आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध निवडून आले आहेत. तर सात जागांसाठी रविवारी मतदान झाले. आता मंगळवारी सकाळी नऊ वाजता अल्पबचत भवन येथे या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मतमोजणी मध्ये अ वर्ग गटातील पहिला निकाल अर्ध्या तासात हाती येणार आहे. मतमोजणीसाठी 13 टेबलची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी दिली.