पुणे : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकही दिवस सुटी न घेता कार्यरत असणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना अखेर कोरोनाने गाठले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून देशमुख रस्त्यावर उतरून कोरोना रुग्णांसाठी अविरत झटत होते. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी प्रशासकीय पातळीवर उत्तम नियोजन केले होते. मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका सुरू होत्या. पवार यांनादेखील कोरोना झाला आहे. त्यांच्या पाठोपाठ देशमुख यांनाही कोरोनाने गाठले आहे. डॉक्टरांच्या निगराणीखाली जिल्हाधिकारी घरीच उपचार घेत आहेत.