Pune School Reopen: पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू, विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेतच : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 12:05 PM2022-01-29T12:05:55+5:302022-01-29T12:12:24+5:30
सध्या नव्याने कोरोनाचे आढळत आहेत. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावा- अजित पवार
पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यापूर्वी राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर २३ जानेवारीला राज्यातील काही भागातील शाला सुरू झाल्या होत्या पण पुणे जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचाच निर्णय घेतला होता. आता येत्या १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील शाळा सुरू होतील अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पहिली ते आठवीपर्यंतची शाळा 4 तास सुरू ठेवली जाणार आहे. आपल्या पाल्ल्यांना शाळेत पाठवायचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी पालकांनी घ्यायचा आहे. शाळेत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल, असंही पवार म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले, सध्या नव्याने कोरोनाचे आढळत आहेत. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावा. मास्क न वापरण्यासंबंधी कुठेही चर्चा झाली नाही. पुढचे काही दिवस मास्क वापरावाच लागेल. लसीकरणाबद्दल आणखी जास्त काम करण्याचं ठरवलं आहे. शाळा सुरू झाल्यानंतर लहान मुलांना लस देता येईल.
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी मोबाईल व्हॅन तयार करून लसीकरण करण्याच्या सूचना दोन्ही महानगरपालिकांना देण्यात आल्या असल्याची माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.