पुणे निवडणूक निकाल २०१९ : जेसीबी ने गुलाल उधळुन '' अजितदादां ''चा विजयोत्सव, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 02:15 PM2019-10-24T14:15:10+5:302019-10-24T14:23:44+5:30

Baramati election result 2019 : भाजपचे ढाण्या वाघ म्हणुन मुख्यमंत्र्यांनी नामांकन केलेले उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासह विरोधकांवर अनामत रक्कम जप्त करण्याची नामुष्की ओढवली..

Pune Election Result 2019 : 'Ajit Pawar' won against gopichand padalkar in baramati ; celebration by overthrowing Gulal | पुणे निवडणूक निकाल २०१९ : जेसीबी ने गुलाल उधळुन '' अजितदादां ''चा विजयोत्सव, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

पुणे निवडणूक निकाल २०१९ : जेसीबी ने गुलाल उधळुन '' अजितदादां ''चा विजयोत्सव, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

Next

बारामती : सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासुनच अजित पवार यांना मिळालेल्या मताधिक्क्यानेच त्यांचा विजय अधोरेखित केला.या निवडणुकीत ''अजितदादां''नी मिळविलेल्या मताधिक्क्याने भाजपचे ढाण्या वाघ म्हणुन मुख्यमंत्र्यांनी नामांकन केलेले उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासह विरोधकांवर अनामत रक्कम जप्त करण्याची नामुष्की ओढवली.मतमोजणीच्या २७ फेरीअखेर अजित दादांनी १ लाख ६३ हजार १७६ मतांची आघाडी घेतल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर बारामतीत जल्लोष केला.यावेळी कार्यकर्त्यांनी जेसीबी च्या बकेट मध्ये बसुन गुलाल उधळला.
निकालाच्या पुर्वसंध्येलाच बारामतीत काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासह रोहित पवार यांच्या विजयाबदद्ल अभिनंदन करणारे  फलेक्स झळकवले.त्यामुळे पवार यांच्या विजयाच्या घोषणेची औपचारीकता बाकी होती. मतमोजणी सुरु झाल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्या फेरीअखेर ७ हजारांची आघाडी घेतली,त्यानंतर दुसºया फेरीअखेर १२ हजार २२९, तिसºया फे रीअखेर १८ हजार ९२२, चौथ्या २५ हजार ५५२, पाचव्या ३१ हजार ५४८, सहाव्या ३७हजार ८३, ७ व्या फेरीअखेर ४३ हजार ४७७, दहाव्या फेरीअखेर ६४ हजार ४२१, अकराव्या फेरीअखेर ७० हजार ९७७, बाराव्या फेरीअखेर ७७ हजार ९३६, तेरााव्या ८४ हजार ८५३, पंधराव्या ९७ हजार ७६, सोळाव्या १ लाख २ हजार ४५०, १७ व्या १ लाख ८ हजार ७८२,  १८ व्या १ लाख १४ हजार ९३९, २१ व्या फेरीअखेर १ लाख ३३ हजार ३३१, २२ व्या १ लाख ३८ हजार ४३३, २४ व्या फेरीअखेर १ लाख ४९ हजार ७७, २५ व्या १ लाख ५५ हजार ७५३, २६ व्या फेरीअखेर १ लाख ६१ हजार ९४२, २७ व्या फेरीअखेर अजित पवार यांना १ लाख ६३ हजार १७६ मतांची आघाडी मिळाली आहे. आणखी दोन मतदान कें द्राची मतमोजणी सुुरु  आहे.२६ व्या फेरीअखेर अजित पवार यांना अधिकृत जाहिर झालेल्या आकडेवारीनुसार १ लाख ९० हजार ३६२, भाजपचे गोपीचंद पडळकर यांना २६ व्या फेरीअखेर २९ हजार ३९७ मते मिळाली आहेत.
बारामती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे माहेरघर आहे.लोकसभा,सहकारी साखर कारखान्यांपासुन स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या निवडणुकांपासुन विरोधक राष्ट्रवादीला मात देण्याचा प्रयत्न करतात.मात्र, पवारांची यावर मजबुत पकड असल्याने विरोधकांचे प्रयत्न निष्फळ ठरतात. हि निवडणुक देखील त्यास अपवाद ठरली नाहि. बारामतीसह विविध ठीकाणी राष्ट्रवादीने यश मिळविले आहे.मात्र,  आघाडी सत्तेपासुन दुर राहणार असल्याचे चित्र दिसल्यानंतर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुकशुकाट दिसुन आला.
——————————————
 

 

Web Title: Pune Election Result 2019 : 'Ajit Pawar' won against gopichand padalkar in baramati ; celebration by overthrowing Gulal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.