शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पुणे निवडणूक निकाल २०१९ : जेसीबी ने गुलाल उधळुन '' अजितदादां ''चा विजयोत्सव, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 2:15 PM

Baramati election result 2019 : भाजपचे ढाण्या वाघ म्हणुन मुख्यमंत्र्यांनी नामांकन केलेले उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासह विरोधकांवर अनामत रक्कम जप्त करण्याची नामुष्की ओढवली..

बारामती : सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासुनच अजित पवार यांना मिळालेल्या मताधिक्क्यानेच त्यांचा विजय अधोरेखित केला.या निवडणुकीत ''अजितदादां''नी मिळविलेल्या मताधिक्क्याने भाजपचे ढाण्या वाघ म्हणुन मुख्यमंत्र्यांनी नामांकन केलेले उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासह विरोधकांवर अनामत रक्कम जप्त करण्याची नामुष्की ओढवली.मतमोजणीच्या २७ फेरीअखेर अजित दादांनी १ लाख ६३ हजार १७६ मतांची आघाडी घेतल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर बारामतीत जल्लोष केला.यावेळी कार्यकर्त्यांनी जेसीबी च्या बकेट मध्ये बसुन गुलाल उधळला.निकालाच्या पुर्वसंध्येलाच बारामतीत काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासह रोहित पवार यांच्या विजयाबदद्ल अभिनंदन करणारे  फलेक्स झळकवले.त्यामुळे पवार यांच्या विजयाच्या घोषणेची औपचारीकता बाकी होती. मतमोजणी सुरु झाल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्या फेरीअखेर ७ हजारांची आघाडी घेतली,त्यानंतर दुसºया फेरीअखेर १२ हजार २२९, तिसºया फे रीअखेर १८ हजार ९२२, चौथ्या २५ हजार ५५२, पाचव्या ३१ हजार ५४८, सहाव्या ३७हजार ८३, ७ व्या फेरीअखेर ४३ हजार ४७७, दहाव्या फेरीअखेर ६४ हजार ४२१, अकराव्या फेरीअखेर ७० हजार ९७७, बाराव्या फेरीअखेर ७७ हजार ९३६, तेरााव्या ८४ हजार ८५३, पंधराव्या ९७ हजार ७६, सोळाव्या १ लाख २ हजार ४५०, १७ व्या १ लाख ८ हजार ७८२,  १८ व्या १ लाख १४ हजार ९३९, २१ व्या फेरीअखेर १ लाख ३३ हजार ३३१, २२ व्या १ लाख ३८ हजार ४३३, २४ व्या फेरीअखेर १ लाख ४९ हजार ७७, २५ व्या १ लाख ५५ हजार ७५३, २६ व्या फेरीअखेर १ लाख ६१ हजार ९४२, २७ व्या फेरीअखेर अजित पवार यांना १ लाख ६३ हजार १७६ मतांची आघाडी मिळाली आहे. आणखी दोन मतदान कें द्राची मतमोजणी सुुरु  आहे.२६ व्या फेरीअखेर अजित पवार यांना अधिकृत जाहिर झालेल्या आकडेवारीनुसार १ लाख ९० हजार ३६२, भाजपचे गोपीचंद पडळकर यांना २६ व्या फेरीअखेर २९ हजार ३९७ मते मिळाली आहेत.बारामती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे माहेरघर आहे.लोकसभा,सहकारी साखर कारखान्यांपासुन स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या निवडणुकांपासुन विरोधक राष्ट्रवादीला मात देण्याचा प्रयत्न करतात.मात्र, पवारांची यावर मजबुत पकड असल्याने विरोधकांचे प्रयत्न निष्फळ ठरतात. हि निवडणुक देखील त्यास अपवाद ठरली नाहि. बारामतीसह विविध ठीकाणी राष्ट्रवादीने यश मिळविले आहे.मात्र,  आघाडी सत्तेपासुन दुर राहणार असल्याचे चित्र दिसल्यानंतर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुकशुकाट दिसुन आला.—————————————— 

 

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019