Pune: अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुण्यात निबंध स्पर्धा, सहभागासाठी वय मर्यादा १७ वर्षे ८ महिने ते ५८ वर्षे
By निलेश राऊत | Published: May 25, 2024 09:32 PM2024-05-25T21:32:17+5:302024-05-25T21:32:31+5:30
Pune News: कल्याणीनगर येथील अपघातातील अल्पवयीन मुलाला शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते. हाच धागा पकडून पुणे शहर युवक काँग्रेसने अपघातस्थळीच भव्य राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा आयाेजित केली आहे.
- नीलेश राऊत
पुणे - कल्याणीनगर येथील अपघातातील अल्पवयीन मुलाला शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते. हाच धागा पकडून पुणे शहर युवक काँग्रेसनेअपघातस्थळीच भव्य राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा आयाेजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वय मर्यादा १७ वर्षे ८ महिने ते ५८ वर्षे इतकी असून, विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.
माझी आवडती कार (पोर्शे, फरारी, मर्सडिज, की इतर), माझा बाप बिल्डर असता तर ?, दारूचे दुष्परिणाम, नियमपाळा-अपघात टाळा.अर्थात कायदा सर्वांना सारखा आहे. आजची तरूण पिढी, अन् व्यवसनाधिनता, रस्ते अपघात टाळण्यासाठी काय करावे ?, मी पोलिस अधिकारी झालो तर..?, भारतात खरंच कायद्यापुढे समानता राहिली आहे का ?, अश्विनी कोष्टा व अनिश अवधिया यांचे खरे मारेकरी कोण ?, माझ्या स्वप्नातील पुणे शहर /असं असावं माझं पुणे शहर हे विषय निबंध स्पर्धेसाठी देण्यात आले आहे. आज (दि.२६) अपघातस्थळी म्हणजे बॉलर पबसमोर कल्याणीनगर येथे ही निबंध स्पर्धा होणार आहे. आमदार रविंद्र धंगेकर यांच्याहस्ते होणार आहे.