शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

Pune Fashion Street Market Fire: पुणे फॅशन स्ट्रीटला लागलेली आग आटोक्यात; लाखोंचं नुकसान, आगीतून निघतायेत संशयाचे धूर   

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 2:21 AM

कॅम्प परिसरातलीच आगीची पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवाजी मार्केटमध्ये देखील आग लागली होती.

पुणे - पुण्यातल्या कॅम्प परिसरातल्या फॅशन स्ट्रीटला रात्री ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, अनेक दुकाने जळून खाक झाली, अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी पोहचले असताना गर्दीमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, साधारण २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं.( Fire breaks out at Fashion Street market in Camp area of Pune)

कॅम्प परिसरातलीच आगीची पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवाजी मार्केटमध्ये देखील आग लागली होती. पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीट हे प्रसिद्ध कपड्यांचे मार्केट आहे. अत्यंत तोकड्या जागेत असलेले हे मार्केट अनेक पुणेकरांचे आकर्षण राहिलं आहे. या आगीत व्यापाऱ्यांचे लाखोंचे रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांपासुन हे मार्केट इथून हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आग नेमकी लागली कशी याची चौकशी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

 

लोकमतशी बोलताना एक व्यापारी म्हणाले “आग लागल्यानंतर आम्ही लगेचच फायर ब्रिगेडला कळवले. मात्र जवळपास दीड तासाने फायर ब्रिगेड इथे दाखल झाले. त्यामुळे जास्त नुकसान झाले आहे, या ठिकाणी कोणती खाऊ गल्ली नाही. साधी चहाची टपरी देखील नाही. त्यामुळे इथे आग लागली तरी कशी हा प्रश्न आहे. आमचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता  आहे” असे आणखी एका व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

काही मिनिटांतच आग वाऱ्यासारखी पसरली

११ च्या सुमारास ही आग लागलेली असताना बघता बघता संपूर्ण मार्केट जळून खाक झाले, आगीचे गोळे आकाशात दूरवर दिसत होते, अंदाजे २००० च्या वर कपडे, चप्पल, गॉगलची दुकाने आहेत, काही मिनिटांतच संपूर्ण मार्केट जळून खाक, २००० साली एम जी रोड वरील व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी १ वर्षाच्या कालावधीपुरतं फॅशन स्ट्रीट (जुने कांबळे मैदान) याठिकानी जागा देण्यात आली होती. त्याचे आजतागायत नूतनीकरण झालेले नाही त्यावेळी व्यापाऱ्यांची संख्या ४०० होती, आज हीच संख्या २ हजाराहून अधिक झाली आहे. पार्किंगमध्येही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत दुकाने थाटण्यात आली होती, येथे अनेक व्यापारी संघटना अस्तित्वात आहे.

आगीत काही कोटींचे नुकसान झाले असून आत जाण्यासाठी मार्ग नसल्याने मोहम्मद रफी चौक, मोती बिल्डिंगची गल्ली, आणि फॅशन स्ट्रीटच्या बाहेर फायर ब्रिगेडच्या गाड्या थांबवल्या होत्या. २०१७ मध्ये मुंबईतील कमला मिल परिसरात आगीची दुर्घटना घडली होती, त्यानंतर पुणे येथील फॅशन स्ट्रीटचे कॅन्टोन्मेंट, पुणे मनपा व  पिंपरी चिंचवड मनपाने २०१८ साली संयुक्त रित्या फायर ऑडिट करत फॅशन मार्केट धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता.

टॅग्स :Puneपुणेfireआग