शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Pune FC Road Drugs Case: पोलिसांच्या ताब्यातील २ तरुणांची ड्रग्सचे सेवन केल्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 17:24 IST

दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते, मात्र त्याअगोदरच दोघांनी ड्रग्सचे सेवन केल्याची कबुली दिली

Pune FC Road Drugs Caseपुणे एफसी रोडवरील ड्रग्स प्रकरणात L3 बार मध्ये कथित ड्रग्सचे सेवन करणाऱ्या २ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका तरुणाला पुणेपोलिसांनी तर दुसऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा असे दोन तरुणांचे नाव आहेत. दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. परंतु त्याअगोदरच दोघांनी ड्रग्सचे सेवन केल्याची कबुली दिली आहे. दोघेही २४-२५ वर्ष वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे दोन्ही तरुण एकमेकांचे मित्र असून रात्री १.३० वाजता या तरुणांनी L3 बार मध्ये एंट्री केली होती

एफसी रोडवरील एका पबच्या शौचालयात अंमली पदार्थांचे सेवन काही युवक करत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर  एकच खळबळ उडाली होती. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. दरम्यान ड्रग्स पार्टी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरू आहे.  या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. तर त्या हॉटेलच्या मॅनेजरसह ७ जणांना ताब्यात घेतले आहे. तर उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल सील करण्यात आले असून हॉटेलमधील सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे.

पब मध्ये प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी. अल्पवयीन मुलांना पबमध्ये प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना मद्य विक्री करण्यात येऊ नये. रात्री दीड वाजेनंतर पब सुरू ठेऊ नयेत. नागरिकांना त्रास झाल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, अशा सूनचा पब चालकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मात्र या आदेश आणि नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे या व्हिडिओमध्ये असलेल्या वेळेवरून स्पष्ट होत आहे. त्यानंतर पोलीस आणि उत्पादनशुल्क विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. 

ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर पुणे शहरात कोट्यवधींचे ड्रग्स पकडण्यात आले होते. पोलिसांनी कडक कारवाई करत शहर पिंजून काढ्ले होते. त्यानंतर कल्याणीनगर अपघात प्रकरण घडले. त्यामध्ये अल्पवयीन मुलांना सर्रासपणे दारू, ड्रग्स देतानाचे व्हिडिओ समोर आले. त्यावरून पोलिसांनी पुन्हा पब, बार बाबत कडक नियमावली जाहीर केली. परंतु रविवारच्या ड्रग्स फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स प्रकरणाने पुन्हा प्रशासन थंड झाले आहे का? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. त्यावरून आता पोलीस, महापालिका यांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे.

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhotelहॉटेलMONEYपैसा