पुणे - महिलांची नृत्य स्पर्धा, संतूर वादक मदन ओक आणि ज्येष्ठ तबलावादक पं. रामदास पळसुले यांनी सादर केलेला ‘संतूर धून मंतरलेली’ कार्यक्रम, शास्त्रीय वाद्यांचा मिलाफ अशा विविध माध्यमांतून पुणे फेस्टिव्हलमध्ये नृत्य, नाट्य आणि संगीताचा अनोखा मिलाफ रसिकांना अनुभवायला मिळाला.महिला महोत्सवाअंतर्गत झालेल्या महिलांच्या नृत्य स्पर्धेमध्ये २० ते ३५ वर्षे आणि ३६ ते ५० अशा वयोगटातील महिला सहभागी झाल्या होत्या. संयोगिता कुदळे व दीपाली पांढरे यांनी याचे संयोजन केले होते. दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, मोहन टिल्लू, रवींद्र दुर्वे, सुप्रिया ताम्हाणे, अभय शास्त्री, मीरा पाथरकर, सुचित्रा दाते, संयोगिता कुदळे आणि दीपाली पांढरे आदी उपस्थित होते.प्रख्यात कलावंत पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य असणारे ज्येष्ठ संतूरवादक पंडित मदन ओक यांनी संतूरवादनातून प्रेक्षकांची मने जिंकली. पं. रामदास पळसुले यांनी तबल्यावर केलेली साथ अतिशय कसदार ठरली. महापौर मुक्ता टिळक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला. गणेशोत्सवात शास्त्रीय वाद्ये आणि त्यावर उपशास्त्रीय आणि शास्त्रीय रचनांची पर्वणी पुणेकरांनी अनुभवली. पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘हास्योत्सव एकपात्रींचा’ हा कार्यक्रम हशा आणि टाळ्यांनी बहरला. ‘हसायदान फाउंडेशन’ने आयोजन केले होते. ज्येष्ठ एकपात्री कलावंत बंडा जोशी, दिलीप हल्ल्याळ, चैताली माजगावकर-भंडारी, श्रीप्रकाश सप्रे, धनंजय जोशी हे सहभागी झाले होते.निकाल पुढीलप्रमाणे -२० ते ३५ वर्षे वयोगट (सोलो)प्रथम क्रमांक -करिश्मा कोठारेद्वितीय क्रमांक -पूजा अस्मिनकरतृतीय क्रमांक -शुभांगी फंड३६ ते ५० वर्षे वयोगट (सोलो)प्रथम क्रमांक - कात्याद्वितीय क्रमांक -गौरी गोखलेतृतीय क्रमांक -पूनम शिंदे२० ते ५० वर्षे वयोगट (ग्रुप)प्रथम क्रमांक -शिल्पाज वंडर फीट ग्रुपद्वितीय क्रमांक -नुपूर डान्स अॅकॅडमीतृतीय क्रमांक -वज्र ग्रुप
पुणे फेस्टिव्हल : पुणे फेस्टिव्हलमध्ये नृत्य, नाट्याचा मिलाफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 2:29 AM