पुणे शहरातील फॅशन स्ट्रीट येथे लागलेल्या घटनेनंतर शहरातील आगीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. भवानी पेठेतील अग्रवाल कंपनीला सकाळी ९ तर दुसरी कुमठेकर रस्त्यावरील महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि परिषदेच्या कार्यालयाला दुुपारी आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही मात्र मोठे नुकसान झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या महितीनुसाद, दिलेल्या माहितीनुसार, कुमठेकर रोडवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि परिषदेचे कार्यालय आहे. त्याच ठिकाण दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. काही वेळातच या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली.त्याच नंतर काहीच वेळात अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता.मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. परंतू, कार्यालयातील वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होत्या. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भवानी पेठेतील अग्रवाल कॉलनी येथे लागली आग होती. यात ६ विद्युत मीटर जाळून खाक झाले होते. तळमजल्यावरील विद्युत पुरवठा करणाऱ्या मीटर ला आग लागून मोठा स्फोट झाला. सकाळी ९ च्या दरम्यान हिरा बिल्डिंग मधील इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या सोसायटीच्या मीटर ला आग लागून सर्व मीटर जाळून कोळसा झाली आहेत या सोसायटीत एकूण सहा कुटुंब राहतात अचानक लागलेल्या आगीमुळे येथील सर्व राहवासी घाबरून गेले पुणे कॅन्टोन्मेंट ची एक आणि पुणे महापालिकेची एक अश्या दोन फायर ब्रिगेड च्या गाड्यांच्या माध्यमातून सादर आग विजवण्यात आली आहे. अगरवाल कॉलनी च्या मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाने टाकलेल्या लोखंडी खांबामुळे फायर ब्रिगेड च्या गाडीला आता येण्यास विलंब झाला, त्यामुळे या गाडीला कॅन्टोन्मेंट कामगार वसाहत या ठिकाणाहून वळसा घालत
किसन गोगावले (तांडेल )पुणे मनपा फायर ब्रिगेड- सोसायटीच्या फॉल्टी मीटर मुळे आग लागली असावी त्यामुळे सहाच्या सहा मीटर जाळून खाक झाले 1५ मिनिटातच आग विजवण्यात आली येथे उभ्या असलेली वाहने आणि लोखंडी खांब यामुळे गाडी आत येण्यास त्रास झाला होता.