- किरण शिंदेपुण्यातील कात्रज परिसरात क्रिकेट खेळण्यावरून झालेले भांडण मिटवण्यासाठी आलेल्या दोन गटात पुन्हा वादावादी झाली. आणि त्यानंतर यातील एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार केला. सुदैवाने बंदुकीतून झाडलेली गोळी कुणाला लागली नाही. मात्र त्यानंतर झालेल्या पळापळीत दोन तरुण जखमी झाले. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील दोन गटात मंगळवारी क्रिकेटची मॅच झाली होती. यावेळी या दोन गटात क्रिकेट खेळण्यावरूनच भांडण झाले होते. हे भांडण मिटवण्यासाठी हे दोन्हीही गट कात्रज परिसरातीलच एका निर्माण आधी नसलेल्या इमारतीच्या जवळ गेले होते. यावेळी त्यांच्यात एक सराईत गुन्हेगार देखील हजर होता. दरम्यान भांडण मिटवत असताना त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. एका तरुणाने थेट गावठी कट्टा काढून एका सराईत गुन्हेगारावर तानला. मात्र अन्य एका तरुणाने धक्का दिल्याने बंदुकीतून झाडलेली गोळी दुसऱ्याने त्याला लागली नाही. आणि त्यानंतर या दोन्ही गटात पळापळी झाली. त्या घटनेत दोन तरुण किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. आरोपी आणि फिर्यादींची माहिती घेत काही जणांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण घटनेची माहिती सध्या पोलीस घेत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.