पुणे - पुण्यात दोन दिवसात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. एका बांधकाम व्यवसायिकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तूल कॉक केल्यानंतर गोळी झाडली गेली नाही. तर शेवाळवाडी हडपसर येथे व्यवसायीक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळ्या झाडल्या. या दोन घटनांना काही कालावधी लोटतो आहे ना तो पर्यंतच सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भुमकर चौक परिसरात आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एक व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. गणेश गायकवड (रा. वारजे) असे त्याचे नाव आहे. माचीस मागीतल्याच्या कारणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Pune: पुण्यात गोळीबाराचं सत्र सुरूच, दोन दिवसात गोळीबाराच्या तीन घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 09:44 IST