पुणे : पुण्यातील १४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या हरविलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना या मुलीला पोलिसांनी चंदीगडहून ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आला.
या प्रकरणी वानवडी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यामध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, ५ रिक्षा चालक व इतर आरोपींचा सहभाग आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तब्बल दोन दिवस या मुलीवर नराधमांनी अत्याचार केले आहेत. पहिल्या दिवशी चौघांनी तर दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला.
...अशी फुटली अत्याचाराला वाचापीडित मुलीचे आईवडील वानवडी भागात राहतात. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही, हे पाहून तिच्या आईवडिलांनी शोधाशोध सुरु केली. तरीही तिचा शोध लागला नाही. शेवटी त्यांनी १ सप्टेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मुलीचा शोध घेत असताना पोलिसांना तिच्या मोबाईलचे लोकेशन पुणे स्टेशन परिसरात आढळून आले. त्यादृष्टीने पोलिसांनी परिसरात शोध सुरु केल्यावर एका लॉजमध्ये ही मुलगी आल्याचे दिसून आले. मुलीबरोबर दिसलेल्या दोन रेल्वे कर्मचार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी तातडीने विविध पथकांची नेमणूक करुन या गुन्ह्यातील आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्याचवेळी दुसरीकडे पिडित मुलीचा शोध सुरु होता. तिचा मोबाईल चालू बंद होत असल्याचे तिचे लोकेशन मिळत नव्हते. तांत्रिक विश्लेषणात ती मुंबईहून चंदीगडकडे जाणार्या रेल्वेत असल्याची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर रेल्वे अधिकारी व पोलिसांशी संपर्क साधून मुलीला चंदीगड येथे थांबविण्यात आले. वानवडी पोलिसांचे पथक विमानाने चंदीगडला जाऊन या मुलीला रविवारी पुण्यात येऊन आले. त्यानंतर तिच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यावर तिच्यावरील अत्याचाराची कहाणी ऐकून पोलीसही स्तब्ध झाले.
या प्रकरणातील ८ आरोपींना पोलिसांनी रात्रीतून अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी न्यायालयात सांगितले की, हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असून त्यातील अटक आरोपी व ५ फरार आरोपींनी मिळून निर्जनस्थळी, जंगलात, लॉजवर व रेल्वे ऑफिसमध्ये अशा ३ ते ४ ठिकाणी या पीडितेवर सामूहिक अत्याचार केला आहे. यातील ५ फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. रिक्षाचालक मशाक कान्याल व मीरा शेख यांनी रिक्षामध्येही तिच्यावर अत्याचार केला आहे. ती रिक्षा जप्त करायची आहे. तसेच या सर्व ठिकाणी जाऊन पंचनामा करायचा आहे. त्यानंतर न्यायालयाने सर्वांना १० दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
अटक आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी मशाक अब्दुलमजिद कान्याल (वय २७, रा. वैदुवाडी, हडपसर), अकबर उमर शेख (वय ३२, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ), रफिक मुर्तजा शेख (वय ३२, रा. मंगळवार पेठ), अरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (वय २७, रा. कासेवाडी), प्रशांत सॅमियल गायकवाड (वय ३२, रा. ताडीवाला रोड), राजकुमार रामनगीना प्रसाद (वय २९, रा. घोरपडी गाव), नोईब नईम खान (वय २४, रा. बोपोडी), असिफ फिरोज पठाण (वय ३६, रा. लोहीयानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आई वडिलांना ठार मारण्याची आरोपींनी दिली धमकी पीडित मुलगी मुळची बिहार येथील आहे. तिचे वडील वानवडी येथील एका ठिकाणी माळीकाम करतात. ती तिच्या आई-वडिलांसोबत राहते. ३१ ऑगस्ट रोजी मुलगी तिच्या बिहार येथील मित्राला भेटायला निघाली होती. घरच्यांना याची माहिती न देताच ती पुणे स्टेशन परिसरात आली होती. मात्र तो मित्र आलाच नाही. तसेच रात्री कोणतीही रेल्वे नव्हती. रात्री उशिरापर्यंत ती स्टेशन परिसरात फिरत होती. आरोपींची नजर तिच्यावर पडली. त्यांनी तिला रात्री राहण्याची सोय करतो, उद्या रेल्वेत बसवून देतो, असे सांगितले. त्यामुळे ती या रिक्षाचालकाबरोबर गेली. रिक्षाचालकाने वाटेत आणखी एका रिक्षाचालकाला बरोबर घेतले. तेथून तिला एका लॉजला नेले. तेथे तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन रिक्षाचालकांनी तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, हा प्रकार कोणाला सांगितला तर, आईवडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी दुसर्या दिवशी दुसर्या लोकांच्या ताब्यात तिला दिले. दुसर्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर मुलगी रेल्वेने मुंबई आणि तेथून चंढीगडकडे गेली होती