शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Pune Ganpati: ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष अन् ढोल-ताशांच्या गजरात हाेणार ‘श्रीं’चे जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 2:47 PM

गणेश चतुर्थीला पाच मानाच्या गणपतींसह प्रतिष्ठित मंडळांच्या गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार

पुणे : कोरोनाचे मळभ दूर करून चैतन्यरुपी सुमनांचा सुगंध पसरविण्यासाठी पुण्यनगरीत गणरायाचे बुधवारी (दि. ३१) आगमन होत आहे. तब्बल दोन वर्षांनंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात ‘श्रीं’चे जंगी स्वागत करण्यासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. शहरातील संपूर्ण वातावरण ‘गणेश’मय झाले आहे. ‘श्रीं’च्या प्राणप्रतिष्ठापनेसह मिरवणुकीच्या तयारीत कार्यकर्ते व्यस्त झाले आहेत. गणेश चतुर्थीला पाच मानाच्या गणपतींसह प्रतिष्ठित मंडळांच्या गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

श्री कसबा गणपती

पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून, हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक अशा देशासाठी बलिदान दिलेल्यांचा सन्मान म्हणून यावर्षी हुतात्मा राजगुरू यांचे नातू धैर्यशील व सत्यशील यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८.१५ वाजता ‘श्रीं’ची मिरवणूक निघणार असून, यात संघर्ष, वाद्यवृंद, श्रीराम पथक आणि प्रभात बँड सहभागी होणार आहेत.

श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ

चांदीच्या पालखीत विराजमान होत असलेल्या मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या ‘श्रीं’च्या आगमनाची मिरवणूक सकाळी १०.३० वाजता नारायण पेठेतील न. चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून कुंटे चौक, गणपती चौक मार्गे उत्सव मंडपात पोहोचणार आहे. या मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँन्ड, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल पथक, विष्णूनाद शंख पथक, आम्ही गोंधळी गोंधळी संबळ पथक सहभागी होणार आहे. ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२.३० वाजता सनई-चौघडा व संबळच्या कर्णमधूर साथीत कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष व मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वस्त मिलिंद अनंत काळे व मीरा मिलिंद काळे यांच्या हस्ते होणार आहे.

गुरुजी तालीम मंडळ

मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना दुपारी २ वाजून १० मी. पुनीत व जान्हवी बालन यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी श्रींच्या आगमनाची मिरवणूक सकाळी १०.३० वाजता गणपती चौकातून सुरू होईल. गणपती चौक, लिंबराज महाराज चौक- अप्पा बळवंत चौक- जोगेश्वरी चौक - गणपती चौक मंडप या मार्गावरून मिरवणूक निघेल. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारा वादन, अतुल बेहरे यांचे महिलांचे नादब्रह्म पथक, गर्जना पथक, गुरुजी प्रतिष्ठान, श्री ढोल ताशा पथक येरवडा, समर्थ प्रतिष्ठान, नादब्रह्म ट्रस्ट पथक यांचा समावेश आहे. सुभाष सरपाले व स्वप्नील सरपाले यांनी बनविलेल्या आकर्षक फुलांच्या रथातून श्रींची मिरवणूक निघेल.

श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्ट

मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपती मंडळाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना दुपारी २.३० वाजता उद्योजक पुनीत व जान्हवी बालन यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता ‘श्रीं’ची मिरवणूक गणपती चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, समाधान चौक ते गणपती चौक मार्गे उत्सव मंडपात पोहोचेल. या मिरवणुकीत शिवगर्जना, समर्थ प्रतिष्ठान, उगम ही पथके सहभागी होणार आहेत.

केसरीवाडा गणेशोत्सव

मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणेशोत्सवाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना सकाळी १०.३० वाजता डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी सकाळी १० वाजता रमणबाग चौक ते केसरीवाडा पर्यंत चांदीच्या पालखीत श्रींची मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीत श्रीराम पथक, शिवमुद्रा ढोलताशा पथक आणि बिडवे बंधूंचे नगारा वादन असणार आहे.

अखिल मंडई मंडळ 

अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक फुलांनी सजलेल्या मंगल कलश रथातून सकाळी ९ वाजता निघणार आहे. बुधवारी (दि. ३१) दुपारी १२ वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रताप अनंत गोगावले आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गोगावले यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडेल. शारदा गजानन मंदिरापासून मिरवणूक निघून मंडई पोलीस चौकी ते रामेश्वर चौकापर्यंत जाऊन पुन्हा मंडई पोलीस चौकी मार्गे उत्सव मंडपात येणार आहे. रंगीबेरंगी आरसे आणि झुंबराने सजलेल्या भव्य स्वप्न महालात हलत्या झोपाळ्यावर शारदा गजानन विराजमान होणार आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी गुजरात गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. ट्रस्टच्या १३० व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे. मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता राज्याचे उच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होईल. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून गरुड रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले गरुड रथावर लावण्यात येणार आहेत. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना दुपारी १२.३० वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी भाऊसाहेब रंगारी भवन- बुधवार चौक- अप्पा बळवंत चौक- फुटका बुरुज- भाऊ रंगारी मार्ग- श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर मार्गे मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत जगदंब वाद्य पथक, सामर्थ्य वाद्य पथक, अभेद्य वाद्य पथक, वाद्यवृंद वाद्य पथक, चेतक वाद्य पथक, कलावंत वाद्य पथक, श्रीराम वाद्य पथक आदी पथके सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवSocialसामाजिकganpatiगणपती